सिनेमा

'आदिपुरूष' मधील वादग्रस्त डायलॉग हटवणार...चित्रपटाच्या कमाईत 40% घसरण झाल्यानंतर घेतला निर्णय;लेखक मनोज मुंतशिर यांचं ट्विट

आदिपुरूष हा रामायणापासून प्रेरित आहे. मात्र, हा चित्रपट म्हणजे, रामायण नव्हे.... आम्ही केवळ त्यातून प्रेरित झालो आहोत. आम्ही रामायणाचा एक छोटासा भाग बनवला आहे.

Madhuraa Saraf

Adipurush 'आदिपुरुष' चित्रपटाचा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादामुळे रविवारी नेपाळची राजधानी काठमांडू महानगरपालिकेने काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील वादग्रस्त संवादाला होणारा वाढता विरोध पाहता चित्रपटाचे संवाद बदलण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 40% ची घसरण झाली आहे. (om raut)(adipurush controversy) (adipurush troll) (manoj muntashir)

काठमांडूच्या महापौरांचे ट्विट

रविवारी, काठमांडूच्या महापौरांनी खोऱ्यातील सर्व चित्रपटगृहांना सोमवारपासून तेथे कोणताही हिंदी चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले. याबाबत अधिकृत घोषणा करताना त्यांनी एक ट्विटही शेअर केले आहे. यासोबतच यासंबंधीत पत्रेही सर्व चित्रपटगृहांना पाठवण्यात आली आहेत.सीतेच्या जन्मस्थानावरून वादहा सगळा वाद चित्रपटात सीतेला भारताची कन्या म्हणण्यावरून झाला आहे. नेपाळी सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप घेतला. सीताजींचा जन्म भारतात नसून नेपाळमधील जनकपूरमध्ये झाला असल्याचं त्यांनी सांगितले.मात्र, या वादानंतर निर्मात्यांनी चित्रपटातून तो संवाद काढून टाकला, त्यानंतर हा चित्रपट तिथे प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र सीतेच्या जन्मस्थानाची चर्चा सुरूच आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की सीतेचा जन्म नेपाळमध्ये नसून बिहारमधील सीतामढीमध्ये झाला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 100 कोटींची कमाई केली. दुसरीकडे, चित्रपटाशी संबंधित वादांचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होत नाहीये. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचे कलेक्शन केले. जगभरात पाहिले तर या चित्रपटाने दोन दिवसांत 240 कोटींची कमाई केली आणि 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेतली. मात्र, पहिल्या दिवशी या चित्रपटाचे जगभरात 140 कोटींचे कलेक्शन झाले. अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 40% घट झाली आहे.

मुंतशिर यांचे ट्विट

मुंतशिर म्हणाले, दुखावणारे संवाद बदलतीलयाआधी चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी ट्विट करून आदिपुरुषचे वादग्रस्त संवाद बदलणार असल्याची माहिती दिली होती. मुंतशिर यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, 'मी आणि चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकाने ठरवले आहे की आम्ही तुम्हाला त्रास देणारे काही संवाद सुधारू आणि या आठवड्यात चित्रपटात समाविष्ट करू.' या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यामध्ये चित्रपटातील अनेक दृश्ये, संवाद आणि पात्रे काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनोज म्हणाला - आम्ही चित्रपटाचे नाव रामायण देखील ठेवू शकलो असतो. आज तकशी बोलताना, त्यांनी हा चित्रपट रामायणापासून प्रेरित असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'या चित्रपटाचे नाव 'आदिपुरुष' आहे. मला एकाच वेळी दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही रामायण बनवलेलं नाही, आम्ही केवळ त्यातून प्रेरित झालो आहोत. आम्ही रामायणाचा एक छोटासा भाग बनवला आहे.मनोज पुढे म्हणाला, 'जर तुम्हाला आमचा डिस्क्लेमर दिसत असेल, तर आम्ही याबद्दल अगदी स्पष्ट माहिती दिली आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी पाहता या चित्रपटाचे नावही आम्ही रामायण ठेवू शकलो असतो. पण आम्हाला सुरुवातीपासूनच माहीत होतं की आम्ही रामायण बनवत नसून आमचा चित्रपट फक्त रामायणापासून प्रेरित आहे.रामायणातील लढाईचा एक छोटासा भाग आपण केला आहे.

ओम राऊत यांच्यासाठी चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा

चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले की, इतकी नकारात्मक पब्लिसिटी मिळूनही प्रेक्षक चित्रपटाला भरभरून रिस्पॉन्स देत आहेत. चित्रपटगृहांमध्ये जय श्री रामच्या घोषणा दिल्या जात आहेत.ओम म्हणाला, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाला चित्रपटगृहात कसा प्रतिसाद मिळतोय आणि जागतिक बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई पाहून आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Delhi Jama Masjid : दिल्लीतील जामा मशिद पोलीस ठाण्यात पाच पोलिसांवर चाकूने हल्ला; आरोपीच्या पायावर गोळी झाडत केली अटक

Gold Imports Drop : PM Modi यांच्या आवाहनाचा मोठा परिणाम? सोन्याच्या आयातीत तब्बल 40 % घट; 7 महिन्यांत 1.53 लाख कोटींची बचत

Maharashtra Recruitment Exam: पेपरफुटी करणाऱ्यांना १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास; भरती परीक्षांसाठी सरकारचा कठोर ॲक्शन प्लॅन

Leopard Attack in Assam:बिबट्याचा थरारक हल्ला कॅमेऱ्यात कैद; वनविभागाच्या बचावकार्यात मोठी दुर्घटना

IND A vs UAE : गोलंदाजांना सुर गवसेना, युएईचं भारताला 250 धावांचं आव्हान