Adipurush - ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाच्या घोषणेपासून ते टीझर लॉन्च झाल्यापासून या चित्रपटाची प्रचंड हवा होती. मात्र, ही हवा एका क्षणात उडून गेली. कारण, चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास सपशेल अपयशी ठरला आहे. त्यात. रिलीज होण्याआधीच अॅडव्हान्स बुकींगमुळे चित्रपटाने तब्बल 150कोटींची कमाई केली असली तरी,पुढे इतकी कमाई करण्यात चित्रपट यशस्वी होणार की नाही यात शंका आहे. (adipurush) (om raut) (prabhas) (kriti sanon)
‘आदिपुरुष’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ऑनलाइन साइट्सवर लीक झाला आहे. तमिळरॉकर्स, फिल्मीझिला, मुव्हिजरुल्झ आणि इतर पायरसी साइट्सवर ‘आदिपुरुष’ चित्रपट लीक करण्यात आला आहे. हा चित्रपट ऑनलाइीन बघण्याबरोबरच डाऊनलोडही करता येणं शक्य आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर याचा थोडा फार परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे निर्मात्यांची चिंता वाढली आहे. (adipurush leak)
500 कोटींचा बीग बजेट ‘आदिपुरुष’ बॉलिवूडमधील जबरदस्त चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासाठी VFX इफेक्ट देण्यात आलेत. मात्र, या इफेक्टमध्येही फार काही दम नसल्याचं समीक्षक सांगतात. अनेकांनी तर व्हीएफएक्सवरुन टीकाही केली. तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट प्रेक्षकांची निराशा करतोयं.