Allu Arjun In Waves Summit 2025 
सिनेमा

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा

अभिनेता अल्लू अर्जुनने मुंबईत पार पडलेल्या वेव्स समिट २०२५ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने साउथमध्ये सिक्स पॅक्स अ‍ॅब्स ट्रेंड कसा सुरू झाला, याबद्दल सांगितले.

चेतन बोडके

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'पुष्पा' आणि 'पुष्पा २'च्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या अल्लू अर्जुनने जगभरात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अल्लू अर्जुन केवळ अभिनयातच नाही तर त्याच्या फिटनेसमुळेही तो चर्चेत राहिला आहे.

नुकतंच अभिनेता अल्लू अर्जुनने मुंबईत पार पडलेल्या वेव्स समिट २०२५ मध्ये हजेरी लावली होती. कार्यक्रमावेळी अल्लू अर्जुनने 'पुष्पा'मधली सिग्नेचर पोझ करत सर्वच उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी अल्लू अर्जुनने देश आणि जगभरातील चित्रपटांवर भाष्य केले. तसेच साउथमध्ये सिक्स पॅक्स अ‍ॅब्स ट्रेंड कसा सुरू झाला, याबद्दलही सांगितले.

वेव्हज समिट २०२५ (Waves Summit 2025) मध्ये अल्लू अर्जुन म्हणाला, "प्रत्येक अभिनेत्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. विशेषतः इंडियन सेलिब्रिटींसाठी कारण आम्हाला नाचायचे असते, फायटिंग सीन्स करायचे असतात आणि आम्हाला हे माहित नसतं की, शुटिंगचं शेड्युलिंग केव्हा असतं ते. म्हणूनच भारतीय कलाकारांसाठी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. मी वयाच्या १९-२० व्या वर्षापासू अभिनयाची सुरुवात केली होती. मला वर्षभरातच बरेच चांगले- वाईट अनुभव मिळाले. माझ्यासाठी हे खूप कठीण होते, पण जेव्हा तुम्ही स्वतःला इतक्या मोठ्या पडद्यावर पाहता, तेव्हा ते फायदेशीर ठरतं."

अल्लू अर्जुन हा सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवणारा पहिला टॉलिवूड अभिनेता आहे. सिक्स पॅक अ‍ॅब्सबद्दल अल्लू अर्जुन म्हणाला की, होय, मी हे २० वर्षांपूर्वीच केले होते. याआधी कोणत्याही साउथच्या कोणत्याच अभिनेत्याकडे अ‍ॅब्स नव्हते. बॉडी बिल्डिंगबद्दल एक प्रकारचा टॅबू होता. त्यावेळी मला वाटले की ही विचारसरणी बदलण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. माझ्या एका सहकलाकाराने मला हे काम करण्यास मदत केली. खरंतर, त्या सह-कलाकाराने मला म्हटलं होतं की, साउथमध्ये कोणताही अभिनेता सिक्स पॅक बनवू शकत नाही. मी ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि अ‍ॅब्स बनवले."

अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं तर, तो लवकरच सुप्रसिद्ध टॉलिवूड दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबत 'AA22xA6' चित्रपटात काम करणार आहे.  अ‍ॅटलीने शाहरुखसोबत 'जवान' सारखा हिट चित्रपट दिला आहे, त्याने साउथमध्ये 'थेरी' सारखा सुपरहिट चित्रपट देखील बनवला आहे. आता अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटली एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त, अल्लू अर्जुन 'पुष्पा ३' मध्ये देखील दिसणार आहे, त्या सीरीजमधील शेवटचे दोन चित्रपट हिट झाले आहेत, त्यामुळे प्रेक्षक तिसऱ्या भागाचीही वाट पाहत आहेत.

फक्त २ गुंठे जमिनीचा वाद अन् रक्तरंजित खेळ! मंदार किवळेसोबत शुभम चव्हाण खून प्रकरणात आणखी कोणते तीन आरोपी अडकले?

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स