मतदान करा, ५० टक्के सूट मिळवा; ‘पाहिले न मी तुला' नाटकाची खास ऑफर 
सिनेमा

मतदान करा, ५० टक्के सूट मिळवा; ‘पाहिले न मी तुला' नाटकाची खास ऑफर

मतदानाचा दिवस आणि नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग असा योग जुळून आल्याने रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने नाट्यरसिकांसाठी एक जबरदस्त ऑफर ‘पाहिले न मी तुला’या नाटकाने आणली आहे.

चेतन बोडके

कमी कालावधीत ‘सुमुख चित्र’ आणि ‘अनामिका’ प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. उत्तम कथानक, दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय आणि उच्च तांत्रिक मूल्यांमुळे मराठी रसिक प्रेक्षकांना या नाटकाने मोहिनी घातली आहे. मतदानाचा दिवस आणि नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग असा योग जुळून आल्याने रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने नाट्यरसिकांसाठी एक जबरदस्त ऑफर ‘पाहिले न मी तुला’या नाटकाने आणली आहे. या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग येत्या २० नोव्हेंबर रोजी शिवाजी मंदिर, दादर दुपारी ४.०० वा. रंगणार आहे.

मतदान केल्याची खूण तिकीट बारीवर दाखवा आणि तिकिटावर ५०% सवलत मिळवा. तुमचंच वाटेल असं आपलं नाटक असं म्हणत नाटकातील कलाकारांनी मतदानाच्या हक्कासोबत मनोरंजनाचा हक्क ही एन्जॉय करण्याची विनंती केली आहे. ही सवलत फक्त तिकीट बारीवर उपलब्ध असणार आहे. ऑनलाइन नसणार आहे.

लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा धमाल वेध ‘पाहिले न मी तुला' या नाटकातून घेतला आहे. रौप्य महोत्सवी नाटकाचा प्रयोग सादर करणे, हा प्रत्येक कलाकारासाठी एक आनंदाचा क्षण असतो. शिवाजी मंदिर येथे होऊ घातलेल्या रौप्य महोत्सवी प्रयोगाचा आनंद घेत मतदानाचा हक्क ही बजवा असे आवाहन या नाटकात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अंशुमन विचारे, हेमंत पाटील , सुवेधा देसाई यांनी केले आहे.

सुमुख चित्र चे कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. सूत्रधार दिनू पेडणेकर आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत निनाद म्हैसळकर यांचे आहे. प्रकाशयोजननेची जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे.

Nashik News : नाशिकमध्ये महापालिकेच्या रुग्णालयाची दुराव्यस्था; फाटलेल्या गाद्या अन् वॉर्डात मांजरांच्या मुक्तसंचाराने रुग्ण भयभीत

MSRTC NCMC Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डसंदर्भात मोठी अपडेट! ५० रुपयांची अट रद्द, आता फक्त ५ रुपयांचे टॉपअप

Kia India Spinny Partnership: किया इंडियाची स्पिनीसोबत भागीदारी! नवीन किया कारमध्ये अपग्रेड करणे झाले अधिक सोपे

Tiramisu: घरीच बनवा इटालियन तिरामिसू, कॉफी आणि क्रीमच्या स्वादिष्ट डेझर्टची सोपी रेसिपी!

Wai News: वाईच्या उत्कर्ष पतसंस्थेचा राज्यस्तरीय गौरव! 'नवराष्ट्र सहकार भूषण पुरस्कार 2026'ने सन्मानित