(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)  
बॉलीवूड

रितेश देशमुखचा 'Masti 4' कायदेशीर अडचणीत! इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने निर्मात्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल

"मस्ती ४" हा एडल्ट विनोदी चित्रपट अडचणीत आला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि हा खटला का दाखल करण्यात आला जाणून घेऊयात.

सायली ससाणे
  • रितेश देशमुखचा 'Masti 4' कायदेशीर अडचणीत
  • इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने केला गुन्हा दाखल
  • निर्मात्यांना पोलिसांनी बजावली नोटीस

रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय अभिनीत "मस्ती ४" हा एडल्ट कॉमेडी चित्रपट आता त्याच्या ओटीटी रिलीजपूर्वी अडचणीत सापडला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ दीड महिन्यानंतर, चित्रपटावर खटला दाखल करण्यात आला आहे. आरजे आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आशिष शर्माने चित्रपटातील एका दृश्याबद्दल निर्मात्यांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत.

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने हे चित्रपटावर केले आरोप

लाइव्ह लॉनुसार, आरजे आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आशिष शर्माने "मस्ती ४" च्या निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. त्याचा दावा आहे की जानेवारी २०२४ मध्ये त्यानी रिलीज केलेली एक रील, जी व्हायरल झाली होती, ती त्याच्या संमतीशिवाय किंवा श्रेयाशिवाय चित्रपटात वापरली गेली आहे. "शक करने का नतीजा" नावाची रील त्यांनी वापरली आहे आणि आरजे तृप्तीची देखील रील यामध्ये वापरली गेली आहे. इन्फ्लुएन्सरने आता भरपाई आणि पूर्ण नफ्याचा अहवाल चित्रपट निर्मात्यांकडे मागितला आहे, असा आरोप करत की त्याच्या सर्जनशील मालमत्तेचा वापर त्याच्या संमतीशिवाय करण्यात आला आहे.

निर्मात्यांना पोलिसांनी बजावली नोटीस

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती तुषार राव गेडेला याच्या अध्यक्षतेखाली एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना नोटीस बजावली आहे आणि पुढील कारवाईपूर्वी त्याचे त्वरित उत्तर मागितले आहे. आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ जानेवारी २०२६ रोजी अपेक्षित आहे. आता या प्रकरणाचे पुढे काय हे पाहणे बाकी आहे.

"मस्ती ४" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप

मिलाप झवेरी दिग्दर्शित "मस्ती ४" हा चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही आणि तो फ्लॉप झाला. २००४ मध्ये "मस्ती" चित्रपटाचा सुरू झालेला फ्रँचायझीमधील "मस्ती ४" हा चौथा भाग आहे. यापूर्वी या फ्रँचायझीमधील तीन चित्रपट, "मस्ती", "ग्रँड मस्ती" आणि "ग्रेट ग्रँड मस्ती" प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या चित्रपटापासून ही फ्रँचायझी एडल्ट कॉमेडी चित्रपटांची फ्रँचायझी बनली आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी चारही भागांमध्ये मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

December Horoscope: डिसेंबरमध्ये या राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा, लक्ष्मी नारायण योगामुळे मिळणार आर्थिक लाभाच्या संधी

कारमधून 'ते' दोघे आले, अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवलं अन् नंतर...; अपहरणाचा थरारक प्रकार समोर

पायात अशक्तपणा, मुंग्या, बधिरपणा जाणवतो? मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या