(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)  
बॉलीवूड

धुरंधर’ वादाच्या भोवऱ्यात; 'या' एका वाक्यावर आक्षेप, अस्लम चौधरीच्या पत्नीची कोर्टात जाण्याची धमकी

धुरंधरमधील एका वाक्यावर चौधरी अस्लम खानची पत्नी नोरीन यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. 

अमृता यादव

आदित्य धर यांचा "धुरंधर" हा चित्रपट, जो वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे, तो पाकिस्तानमधील दहशतवादाविरुद्ध, विशेषतः कराचीच्या लियारी टोळ्यांविरुद्ध भारताच्या लढाईचे अर्ध-काल्पनिक वर्णन आहे. चित्रपटातील अनेक पात्रे वास्तविक लोकांवर आधारित आहेत. या सिनेमात रणवीरने मेजर मोहित शर्मा या पाकिस्तानात भारतीय गुप्तहेर बनून राहिलेल्या भारतीय लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर सिनेमात अभिनेता संजय दत्त पाकिस्तानी पोलीस अधिकारी चौधरी अस्लम खानच्या भूमिकेत आहे. पण धुंरधर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चौधरी अस्लम खानची पत्नी नोरीन यांनी रणवीरच्या सिनेमातील काही डायलॉगवर नाराजी व्यक्त करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

डायलॉग पाकिस्तानच्या पॉडकास्टवर बोलताना नूरीन या म्हणाल्या की, ''१९९० च्या दशकात खलनायक पाहिल्यापासून त्यांचे पती संजय दत्तचा फॅन होते आणि त्यांना विश्वास होता की अभिनेता त्याच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देईल. पण त्यांना एक तक्रार होती. संजय दत्त माझ्या पतीच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देतील याची मला खात्री आहे". 'धुरंधर' सिनेमात संजय दत्तने साकारलेल्या एसपी चौधरी अस्लम खान यांच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देताना सैतान आणि जीन यांची संतती असे शब्द वापरण्यात आले आहेत.''

धुरंधरमधील या वाक्यावर चौधरी अस्लम खानची पत्नी नोरीन यांनी आक्षेप घेतला आहे,"आम्ही मुस्लिम आहोत आणि असे शब्द केवळ असलमचाच नाही तर त्याच्या आईचाही अपमान करतात, जी एक साधी, प्रामाणिक महिला होती. जर मला असे वाटत असेल की चित्रपटात माझ्या पतीला नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आले आहे किंवा त्याच्याविरुद्ध कोणताही प्रचार करण्यात आला आहे, तर मी निश्चितपणे सर्व कायदेशीर कारवाई करेन. भारतीय चित्रपट निर्मात्यांना पाकिस्तानची बदनामी करण्याशिवाय दुसरा कोणताही विषय सापडत नाही हे विचित्र आहे."

भारताच्या वाघिणींनी जपानला फाडून खाल्ले; 4-0 ने पराभव अन् थेट 'या' रॅंकिंगमध्ये...

फक्त २ गुंठे जमिनीचा वाद अन् रक्तरंजित खेळ! मंदार किवळेसोबत शुभम चव्हाण खून प्रकरणात आणखी कोणते तीन आरोपी अडकले?

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम