सिनेमा

'लाल सिंग चड्ढा'च्या बहिष्कारावर दिग्दर्शक अनुराग कश्यपची प्रतिक्रिया, म्हणाला- 'सुशांत रोज होतोय ट्रेंड, एक नवीन संस्कृती...'

आमिर खान आणि करीना कपूरचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालायं. 11 ऑगस्टला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणारे.

Payal Hargode

आमिर खान आणि करीना कपूरचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालायं. उद्या म्हणजेच 11 ऑगस्टला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणारे. अशा स्थितीत काही काळापासून सोशल मीडियावर 'लाल सिंग चड्ढा'वर बहिष्कार टाकण्याची मागणी होतीये.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की #boycottlaalsinghchaddha देखील ट्विटरवर सतत ट्रेंड होत आहे. अशा परिस्थितीत दिग्दर्शक अनुराग कश्यपने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले- 'आज जर त्याला 'ब्लॅक फ्रायडे' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' सारखे चित्रपट बनवायचे असतील तर तो ते बनवू शकणार नाही. सुशांत सिंग राजपूत अजूनही ट्विटरवर ट्रेंड करत असताना अनेक हिंदी चित्रपटांवर बहिष्कार टाकला जात आहे.

द इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना, दोबाराचे दिग्दर्शक अनुराग कश्यप पुढे म्हणाले- 'आज जर त्याला राजकारण आणि धर्मावर चित्रपट बनवायचे असतील तर तो करू शकत नाही. मी खूप स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत पण त्यावर कोणीही चित्रपट बनवणार नाही. राजकारण किंवा धर्मावर चित्रपट बनवायचा नाही. आपण खूप विचित्र काळात जगत आहोत. सर्वांवर बहिष्कार टाकला जात आहे. त्यात राजकीय पक्ष, भारतीय क्रिकेट संघाचाही समावेश आहे.

या देशात आता बहिष्काराची संस्कृती आहे. जर तुमच्यावर बहिष्कार टाकला जात नसेल तर तुमची हरकत नाही. 'दोबारा' 19 ऑगस्टला जगभरात रिलीज होणारे. दोबारा हा एक नवीन काळातील थ्रिलर आहे जो 2018 च्या हिट मनमर्जियां आणि बायोपिक ड्रामा सांड की आंख (2019) नंतर तापसी आणि अनुराग तिसऱ्यांदा एकत्र काम करतायेत.

Jawahar Navodaya Vidyalaya : नवोदय विद्यालयात पाण्याची तीव्र टंचाई; 500 विद्यार्थ्यांचे हाल, ऑक्टोबरपासूनच विहीर-बोअरवेलचे पाणी अपुरे

Koyna Dam Water: '६५ वर्षे काय झोपा काढल्या?' विरोधकांना सदाभाऊ खोतांचा सवाल तर सरकारच्या योजनेचे केले समर्थन

PM Kisan Yojana: 'पीएम किसान' लाभासाठी पायपीट, ई-केवायसी पूर्ण, अनुदान जमा होईना; वाशिम जिल्ह्यात सहाही तालुक्यांत नाराजी

Gratuity Calculation : नोकरी सोडताय? 5 वर्षांनंतर 30 हजारांच्या पगारावर किती मिळणार ग्रॅच्युइटी? जाणून घ्या सोपे गणित

IND Vs NZ: ' तेथील खेळपट्टी कशी असेल...'; दुसऱ्या टेस्टआधी हेनरीने केले मोठे भाष्य