(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)  
मराठी सिनेमा

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा नवीन राडा, कॅप्टन आयुषवर विशालचा चढला पारा !

'बिग बॉस' मराठी या शोला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. 'बिग बॉस'ने शेअर केल्या नवीन प्रोमोमध्ये विशाल आणि कॅप्टन आयुषमध्ये वाद होताना दिसत आहे. नक्की काय घडलं जाणून घेऊयात.

सायली ससाणे
  • 'बिग बॉस'च्या घरात नवीन राडा
  • कॅप्टन आयुषवर विशालचा चढला पारा
  • 'बिग बॉस'च्या नव्या प्रोमोने वेधले लक्ष

बिग बॉस मराठी हा शो जसा जसा पुढे जात आहे, तसतसा घरातील खेळ अधिक रंगतदार होताना दिसत आहे. दररोज घरातील स्पर्धकांची समीकरणं बदलताना पाहायला मिळत आहेत. आज जे एकमेकांचे घट्ट मित्र आहेत, तेच पुढच्या एपिसोडमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचं प्रेक्षकांना दिसून येत आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 चा आता सहावा आठवडा सुरू झाला असून घरात टोळी विरुद्ध झुंड अशी स्पष्ट गटबाजी निर्माण झालेली दिसून आलेली आहे.

या सीझनमधील पहिलं एलिमिनेशन नुकतंच पार पडलं आहे, आणि टोळीमधील सदस्य राधा पाटील घराबाहेर पडली आहे. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच घरात वाद-विवाद आणि धिंगाणा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, कालच्या एपिसोडमध्ये अंडी चोरीच्या प्रकारामुळे 'बिग बोस'च्या घरात मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणात विशालने अंडी चोरल्याचं समोर आल्यानंतर, त्याच्यासाठी कोणीही जेवण बनवणार नाही असा निर्णय घेण्यात आला. त्या आठवड्याचा कॅप्टन आयुष संजीव असून, सर्वांच्या संमतीने त्याने हा निर्णय जाहीर केला होता.

तसेच आता 'बिग बॉसच्या घरात पुन्हा मोठा राडा होताना दिसत आहे. आजच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा चोरीचा मुद्दा चर्चेत आल्याचे समोर आले आहे. यावेळी विशालचा बॉडी वॉश चोरीला गेला आहे ज्याचे आरोप आयुषवर करण्यात आला आहे. यामुळे संतप्त झालेला विशाल घरात आरडाओरड करताना दिसतो आहे. नंतर तोच बॉडी वॉश कॅप्टन रूममध्ये सापडतो. आणि तो आयुषवर संतापलेला दिसत आहे.

यानंतर विशाल कॅप्टन आयुषवरच बॉडी वॉश चोरीचा आरोप करतो. “जसं माझं जेवण बंद केलं, तसं आता कॅप्टन आयुषला काय शिक्षा देणार?” असा सवाल तो घरातील सदस्यांना करतो. मात्र आयुष स्पष्ट करतो की तो बॉडी वॉश अनेक दिवसांपासून तिथेच होता. तरीही विशाल कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नसल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

हा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर भरभरून येत आहेत. सतत होत असलेल्या चोरीमुळे अनेकांनी या सीझनला “चोर सिझन” असं संबोधलं आहे. काही प्रेक्षकांनी आयुष निर्दोष असल्याचं मत व्यक्त केलं आहे, तर अनेकांनी विशालला “नारदमुनी” अशी उपमा दिली आहे. टोळीतील सदस्यांना भडकवण्याचा तो सतत प्रयत्न करत असल्याचंही प्रेक्षकांनी म्हटलं आहे. तसेच आता येणाऱ्या 'बिग बॉस'च्या पुढील भागात काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दागिने घडवण्याचे काम मिळाले आणि कोट्यवधींचा ऐवज घेऊन झाले गायब! रविवार पेठेत खळबळ

California Earthquake : कॅलिफोर्निया शक्तिशाली भूकंपाने हादरले! विमानतळावर उडाला गोंधळ, उतरणारी विमाने वळवली; 2014 नंतरचा सर्वात मोठा धक्का

आता मुलांच्या X अकाऊंटवर पालकांचा कंट्रोल! तब्बल 20 वर्षांनंतर पॅरेंटल कंट्रोल फीचर रिलीज... जाणून घ्या सविस्तर

रोजगारासाठी परजिल्ह्यात धाव! एमआयडीसीत मोठ्या उद्योगाची कमतरता; लघु, मध्यम उद्योगावरच भिस्त

Vasai Virar Sports Complex : क्रीडा संकुलाच्या नावावरून वसई-विरार महापालिकेत मोठा राडा! कोणाच्या बाजूने किती पडली मते?