40 वयानंतरही तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी या गोष्टींचे सेवन सुरु करा  
फोटो

40 वयानंतरही तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी या गोष्टींचे सेवन सुरु करा

तरुण आणि सुंदर दिसण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. जसजसे आपले वय वाढू लागते तसतसे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात आणि हळूहळू त्वचा निस्तेज दिसू लागते. याची काही मुख्य कारणे म्हणजे, कोलेजनची कमतरता, जी नैसर्गिकरित्या कमी होते. तरुण आणि सुंदर राहण्यासाठी, कोलेजन वाढवणारे व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असलेले पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. यात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होते ते जाणून घेऊया.

नुपूर भगत
त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात विविध रंगांच्या भाज्यांचा समावेश करा. यात गडद हिरव्या, लाल आणि नारिंगी भाज्या, बीन्स आणि वाटाणे, स्टार्चयुक्त आणि स्टार्च नसलेल्या भाज्यांचा समावेश होतो.
तुम्ही आपल्या आहारात अधिकाधिक फळांचा समावेश करायला हवा. व्हिटॅमिन सी समृद्ध फळे वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात. यात संत्री, लिंबू, आंबा, पेरु, पपई, किवी अशा फळांचा समावेश होतो.
साखर आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही, आपल्या आहारतून गोड पदार्थांचे सेवन कमी करा. याऐवजी आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा.
चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. जसे की, दूध, दही, चीज. तुम्ही फोर्टिफाइड सोया प्रोडक्टस खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळेल.
निरोगी प्रथिनांच्या स्रोतांमध्ये चिकन, सीफूड, अंडी, बीन्स, वाटाणे, नट, बिया आणि सोया यासारखे कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश होतो.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका