अस्सल पारंपरिक हातमागावर विणलेल्या साड्यांची खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
हॅण्डलूम साडी पूर्णपणे हाताने विणली जाते. हॅण्डलूम साडीच्या रंगांमध्ये, धाग्यांमध्ये, साडीवर असणाऱ्या बुट्या एकसमान नसतात. त्यामुळे साडी खरेदी करताना साडीची वीण आणि जाडी पाहणे आवश्यक आहे.
साडीप्रमाणेच तिचा पदर सुद्धा खूप कुशलतेने विणणे सुद्धा आवश्यक आहे. याशिवाय साडीचे काठ उलट, सुलट बाजुने एकसारखेच दिसतात. त्यामुळे हॅण्डलूम साडी खरेदी करताना पारखून घेणे आवश्यक आहे.
साडी खरेदी करताना दोन्ही काठांची टोके बारकाईने तपासणे आवश्यक आहे. कुठे दोरा ओढलेला दिसत असेल किंवा जास्त दोरा दिसतो. काही ठिकाणी धाग्यांच्या अगदी बारीक गाठी सुद्धा असतात.
पॉवरलूम साड्यांपेक्षा हॅण्डलूम साड्या अंगावर मस्त बसतात. हॅण्डलूम साडीचा स्पर्शही अधिक मऊ असतो. त्यामुळे सणावाराच्या दिवसांमध्ये पॉवरलूम साड्यांपेक्षा हॅण्डलूम साड्या खरेदी कराव्यात.
हॅण्डलूम सिल्क साडीवर टॅग असतो. त्यामुळे हॅण्डलूम साडीच्या रंगांमध्ये, धाग्यांमध्ये, साडीवर बुटीमध्ये डिझाईन असते. याशिवाय पैठणीवर सोन्याची जर असते.