उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येतील का?; केंद्रातील 'या' मंत्र्याने केलं मोठं विधान (File Photo) 
राजकारण

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येतील का? तर केंद्रातील 'या' मंत्र्याने केलं मोठं विधान; म्हणाले...

राज ठाकरेंच्या एवढ्या मोठ्या सभा होऊनही त्यांचा एकही माणूस निवडून येत नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे मला दिसत नाही.

कृपादान आवळे

इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता चर्चा सुरु आहे ती ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची. त्यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही. आणि जरी एकत्र आले तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही', असे त्यांनी म्हटले आहे.

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना आठवले बोलत होते. यावेळी विक्रम शेलार, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, अमोल मिसाळ, हनुमंत कांबळे, अरविंद वाघ, कैलास कदम, किरण गानबोटे, लखन जगताप, रमेश शिंदे यांनी आठवले यांचा सत्कार केला.

यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, 'राज ठाकरेंच्या एवढ्या मोठ्या सभा होऊनही त्यांचा एकही माणूस निवडून येत नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे मला दिसत नाही. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही. आणि जरी एकत्र आले तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही'.

यावेळी प्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आठवले म्हणाले, इंदापूर पोलीस खोटे गुन्हे करत असल्याचे सांगितले जाते. कोणताही गुन्हा खोटा असू नये. अशा घटना घडत असतील तर मी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करेल. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चुकीच्या गोष्टी करू नये. चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचं पाठबळ असायला हवे. असे गुन्हे नोंदवले जाऊ नये यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.

'प्रत्येक केसला लव्ह जिहाद म्हणू नये'

'लव्ह जिहाद'चा कायदा असा आहे की, अनेक वेळा मुलं-मुली एकत्र येतात त्यांना त्यांची जात माहित नसते. तरी देखील एकत्र येऊन संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते. धर्म-जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. प्रत्येक केसला लव्ह जिहाद म्हणू नये, असेही आठवले यांनी सांगितले.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका