गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले Gokul Dudh Sangh, Kolhapur News, Bombay High Court, Kolhapur Politics,
राजकारण

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Gokul Milk Union Hearing : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी विजय मिळवला. त्यामुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला धक्का बसला आहे.

anuradha sagar
  • समविचारी आघाडीला याचिकेत दुरुस्तीची परवानगी

  • सर्व घटना अंतिम निर्णयाला अधीन

  • १६ संचालकांना नोटीस व ३ डिसेंबरला पुढील सुनावणी

Gokul Milk Union Hearing News: कोल्हापूर गोकुळ दूध संघाच्या चार शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी पार पडली. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे की अयोग्य, यावर न्यायालयात युक्तिवाद झाला.

गोकुळ सत्तासंघर्षावर कोर्टातील सुनावणीदरम्यान काय काय घडलं?

गोकुळच्या सत्ता संघर्षाची पुढील सुनावणी तीन डिसेंबर 2026 रोजी होणार आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर) झालेल्या सुनावणी दरम्यान समविचारी आघाडीने त्यांनी दाखल केलेल्या मूळ याचिकेमध्ये काही दुरुस्त्या आणि आता अध्यक्ष निवडीसह घडलेल्या सर्व अपडेट्स रेकॉर्डवर आणण्याची परवानगी मागितली. पण महायुतीच्या वकिलांकडून मात्र त्याला विरोध करण्यात आला.

न्यायालायाने समविचारी आघाडीला मूळ याचिकेत दुरुस्ती करण्यास परवानगी दिली. पण त्याचवेळी कोर्टाने या विषयातील सर्व घटना अंतिम निर्णयाला अधीन असतील,असंही स्पष्ट केलं. त्यावर महायुतीच्या वकिलांनी काही संचालकांना नोटीस मिळाली नसल्याचा दावा केला. महायुतीच्या या दाव्यावर वेळ मारुन नेण्यासाठी हा प्रकार सुरु आहे का, असा खडा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, महायुतीचे १२ सदस्य आणि शासन नियुक्त चार सदस्यांना सर्व माध्यमातून नोटीस पाठवण्यात याव्यात, अशा सुचनाही दिल्या. ही नोटीस गोकुळ प्रशासनाने पाठवण्यात यावी. नोटीस पाठवल्यानंतरही महायुतीचे १२ सदस्य आणि चार संचालक हजर झाले नाहीत तर त्यांच्या अनुपस्थितीत न्यायालय सुनावणी सुरू करेल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

शासननियुक्त चारही संचालकांनी महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी विजय मिळवला. त्यामुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला धक्का बसला आहे. या निवडणुकीत शासननियुक्त चारही संचालकांनी महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याचे स्पष्ट झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली १० नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर, तर महायुतीकडून राजेश पाटील रिंगणात होते. गोकुळच्या २५ निवडून आलेल्या संचालकांसह शासननियुक्त चार संचालकांनीही मतदानात भाग घेतला. या मतदानात राजेश पाटील यांनी १६ मते मिळवत विजय मिळवला, तर शशिकांत पाटील-चुयेकर यांना १३ मते मिळाली. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत महायुतीला १६ विरुद्ध १३ असा विजय मिळाला. निवडून आलेल्या संचालकांमध्ये समविचारी आघाडीचे संख्याबळ अधिक असतानाही शासननियुक्त चारही संचालकांची मते महायुतीच्या पारड्यात पडल्याने निकालाचे चित्र बदलले.

निवडणुकीत समविचारी आघाडीला १३, तर महायुतीला १२ जागा

गोकुळ दूध महासंघासाठी १८ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. त्यानंतर १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात आला. एकूण २५ जागांपैकी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला १२ जागा मिळाल्या होत्या.

मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक संख्याबळाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर गोकुळच्या संचालक मंडळावर चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली. या चारही संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुतीने घेतला होता. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या चारही संचालकांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले. परिणामी, निवडून आलेल्या संचालकांमध्ये १३ जागा असलेल्या समविचारी आघाडीला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १३ मते, तर महायुतीला १६ मते मिळाली आणि राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन ठेवण्यात आली होती.

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी कधी होणार आहे?

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सुनावणी पार पडल्यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे.

२५ नोव्हेंबरच्या सुनावणीत न्यायालयाने कोणते महत्त्वाचे निर्देश दिले?

न्यायालयाने समविचारी आघाडीला मूळ याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी दिली असून, या प्रकरणातील सर्व घटना न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहतील असे स्पष्ट केले आहे.

संचालकांना नोटीस बजावण्याबाबत न्यायालयाने काय इशारा दिला आहे?

गोकुळ प्रशासनाने महायुतीचे १२ सदस्य आणि ४ शासननियुक्त सदस्यांना सर्व माध्यमातून नोटीस पाठवावी; नोटीस मिळाल्यानंतरही ते हजर न राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीत सुनावणी सुरू केली जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक

Sinhagad Medical College: तपासणीत दिरंगाई केल्याबद्दल हायकोर्टाने MUHS आणि NMC ला फटकारले; विश्वस्तांना हद्द सोडण्यास बंदी

Vasai Virar Water Cut : वसई-विरारकरांवर पाणीकपातीचे सावट! पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेचे कठोर निर्बंध

पैशांच्या वादातून थरार! पहाटे अडीच वाजता पुण्यातील तरुणाचे अपहरण; स्कॉर्पिओत बसवले अन्...

Colors Marathi Serial: राजगुरूंच्या घरात क्रिकेटचा धुरळा! कोण मारणार बाजी?