राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत शरद पवार यांच्या डिलिमिटेशन पाठिंब्यावर नाराजी व्यक्त केली (फोटो- सोशल मीडिया) 
राजकारण

'३ वर्षे दोन्ही राष्ट्रवादीचं भांडणाचं नाटक...', राज ठाकरेंचा डिलिमिटेशन बिलावरून NCPवर घणाघात

डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांवर निशाणा साधला आहे. तीन वर्षे भांडणाचं नाटक केल्याचा आरोप करत त्यांनी शरद पवारांच्या राजकारणावर टीका केली.

प्रीति माने
  • डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरे यांनी कोणावर टीका केली?डिलिमिटेशन बिलावरून राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला टोला

  • दोन्ही राष्ट्रवादी तीन वर्षे नाटक करत असल्याचा आरोप

  • उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं - राज

Raj Thackeray on NCP delimitation support : मुंबई : डिलिमिटेशन बिलाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. शरद पवार गटावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी निशाणा साधला आहे. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनी एक्सवर डिलिमिटेशनबाबत सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणाले, "२ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो."

सोशल मीडिया पोस्टमध्ये राज ठाकरेंनी लिहिले, "आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील 'दिगू टिपणीस' झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला."

Political News : डिलिमिटेशन बिलाबाबत मनसेची भूमिका काय? बाळा नांदगावकर यांचा धारावी मोर्चातून अदानी समूहावर निशाणा

पुढे त्यांनी लिहिले, "ह्यात देशासमोर चित्र काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केले, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होत. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं है किळसवाणं राजकारण बंद पाडणार?" असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

Political News : "... पण त्यांनी माती खाल्ली", संजय राऊतांचा राष्ट्रवादी शरद पवार गटावर निशाणा

डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरे यांनी कोणावर टीका केली?

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटावर आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षांवर टीका केली. तीन वर्षे दोन्ही पक्षांनी भांडणाचं नाटक केल्याचा आरोप त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजकारणाबाबत काय म्हटले?

“हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं,” असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजकीय भूमिकेवर निशाणा साधला. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष सत्तेच्या दिशेने जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत काय चिंता व्यक्त केली?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून सत्तेसाठीचे राजकीय खेळ सुरू असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. आगामी निवडणुकांमध्ये जनता हे राजकारण थांबवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Cricket News: निकिता सिंगची 80 रन्सची तुफानी खेळी अन्...; ऑक्सिरीच करंडकच्या फायनलमध्ये 'हे' संघ

Border Talks : LAC वर पुन्हा हालचाली! उणे 45°C थंडीत भारतीय लष्कराची मोठी सज्जता, भारत-चीन सीमा चर्चाही सुरू

Love Marriage Dispute : वैजापूरमध्ये प्रेमविवाहावरून राडा! थेट पोलीस ठाण्यात दोन कुटुंबांत हाणामारी

CJP on Delimitation Bill: काँग्रेस इंडिया आघाडीनेतर सीजेपीचाही डिलीमीटेशन बिलाला विरोध; अभिजीत दिपकेंचे मोठं विधान

OR Code कसे काम करते?