हत्या करण्यासाठी जाणीवपूर्वक बाबांची सुरक्षा हटवण्यात आली...; राहुल गांधींचा धक्कादायक दावा   Rahul Gandhi, Rajiv Gandhi, Sonia Gandhi, Belonging A Journey of Love, Rajiv Gandhi Assassination,
राजकारण

Rahul Gandhi on Rajiv Gandhi assassination: बाबांच्या हत्येसाठीच जाणीवपूर्वक सुरक्षा हटवली; राहुल गांधींचा धक्कादायक दावा

सोनिया गांधी म्हणाल्या की, राहुल आपल्या वडिलांसोबत बिहार दौऱ्यावर गेले होते. हा दौरा खूप भीतीदायक होता. त्यावेळी राजीव गांधी विरोधी पक्षनेते होते. ते एका खुल्या जीपमधून प्रवास करत होते. लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली होती.

anuradha sagar
  • राजीव गांधींची सुरक्षा जाणीवपूर्वक हटवली-राहुल गांधी

  • राजीव गांधींचा बिहार दौरा हा अंतिम इशारा-राहुल गांधी

  • तर आपल्याला त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहावं लागेल- राहुल गांधी

Rahul Gandhi on Rajiv Gandhi assassination: राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकावरुन आधीच राजकारण तापलेले असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात यावी, म्हणून त्यांची सुरक्षा जाणीवपूर्वक काढण्यात आली होती. एका व्हिडीओमध्ये सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकावर चर्चा करताना राहुल यांनी हे विधान त्यांची आई सोनिया आणि बहीण प्रियांका यांच्यासोबतच्या एका व्हिडिओमध्ये केलं आहे. त्यांच्या या विधानावरुन देशात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव यांची हत्या झाली होती. व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणाले की, सुरक्षा काढून घेणे ही केवळ चूक किंवा अपघात नव्हता, तर असे वातावरण निर्माण करण्याचा तो एक जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न होता. जे काही घडत होते ते स्पष्टपणे दिसत होते. मी याबद्दल माझे वडील आणि आई दोघांनाही सांगितले होते आणि या विषयावर मी त्यांच्याशी चर्चाही केली होती.

राहुल गांधींच्या या विधानावर सोनिया गांधी म्हणाल्यी की, राहुल आपल्या वडिलांसोबत बिहार दौऱ्यावर गेले होते. हा दौरा खूप भीतीदायक होता. त्यावेळी राजीव गांधी विरोधी पक्षनेते होते. ते एका खुल्या जीपमधून प्रवास करत होते. लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली होती.

सोनिया म्हणाल्या की, जर एखाद्या राज्यात सुरक्षा व्यवस्था कमकुवत असेल आणि भाजप किंवा विरोधी पक्षाचे सरकार सत्तेत असेल, तर सुरक्षेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. या दौऱ्यावरून घरी परतताना राहुल मला म्हणाले होते,"आई, जर आपण बाबांच्या संरक्षणासाठी काही केले नाही, तर मला लवकरच त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहावं लागेल. बिहार दौरा हा त्यांच्यासाठी एक अंतिम इशारा होता.असंही राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.

खुल्या जीपवर दगडफेक-सोनिया गांधी

राजीव गांधींच्या बिहार दौऱ्यादरम्यान राहुल गांधी हेदेखील त्यांच्यासोबत गेले होते. एका खुल्या जीपमधून प्रचार करत असताना त्यांच्यावर दगडफेक झाली होती. जेव्हा तुमच्याकडे योग्य सुरक्षा व्यवस्था नसते आणि तुम्ही विरोधी पक्षात किंवा भाजपशासित राज्यात प्रवास करता, तेव्हा तिथले प्रशासन सुरक्षेकडे फारसे लक्ष देत नाही, बिहार दौऱ्यादरम्यान राजीव गांधींविरोधात होणाऱ्या घोषणाबाजी आणि दगडफेकीमुळे राहुल खूप घाबरले होते." असही यावेळी सोनिया गांधी यांनी नमुद केलं.

सोनिया गांधी रात्रभर जागून काटेरी तारांची तपासणी

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करत म्हणाल्या की, १९८४ मध्ये आजीच्या हत्येनंतर आई सोनिया गांधी यांना त्यांच्या वडील राजीव गांधी यांच्या सुरक्षेची खूप काळजी वाटत होती. आईची खोली घराच्या पुढच्या बाजूला असल्याने तीच त्यांच्यावर लक्ष ठेवत असे. ती रात्री उठून घराबाहेरील काटेरी तार तपासायची आणि सुरक्षा रक्षक झोपलेले नाहीत ना, याची खात्री करायची.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, वडिलांच्या पावलांचा आवाज ऐकू येईपर्यंत मलाही झोप लागत नव्हती. वडिलांच्या मृत्यूबाबत राहुलने केलेले विश्लेषण पूर्णपणे तर्कसंगत होते, तर त्यांची स्वतःची प्रतिक्रिया भावनिक होती.

१९८९ मध्ये सत्ता गमावल्यानंतर सुरक्षा कमी करण्यात आली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान झालेले राजीव गांधी अनेक वर्षे बुलेटप्रूफ जॅकेट घालत होते आणि कमांडोंच्या कडक सुरक्षेत राहत होते, या वस्तुस्थितीवर त्यांचे विरोधक अनेकदा टीकाही करायचे. १९८९ च्या निवडणुका हरल्यानंतर, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी सांगितले की, कमांडोंच्या उपस्थितीमुळे राजीव गांधी जनतेपासून अलिप्त झाले होते, त्यानंतर त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली.

५ मे १९९१ रोजी, बिहारमधील एका सभेत राजीव गांधींनी स्वतः सांगितले होते की धोका अजून टळलेला नाही, पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता: एकतर प्रचार करा किंवा स्वतःच्या सुरक्षेची चिंता करा. अवघ्या १६ दिवसांनंतर त्यांची हत्या झाली.

Kalatmak Rajyog: डिसेंबरच्या सुरुवातीला कलात्मक योगाचा प्रभाव; कर्क राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार करिअरमध्ये मोठे यश

Fashion: महाराष्ट्रीयन साड्यांचे आहेत अनेक प्रकार; पैठणीपासून नऊवारीपर्यंत जाणून घ्या प्रत्येक साडीची खासियत!

Vaibhav Sooryanvanshi: ६ संघाच्या एकत्रित सिक्स वैभवच्या नावे, पाकिस्तानची तंतरली; वैभव सूर्यवंशीची दहशत

Suspicious Death: हृदयविकाराचा झटका असल्याचा बनाव अन् कपाटात लपवलेली ती साडी! सुनेच्या मृत्यू प्रकरणात हत्येचा गंभीर संशय...

Huawei Mate X8 पाहिलात का? मोठी स्क्रीन आणि कॅमेरा पाहून सर्वच झाले चकित... लवकरच बदलू शकतो फोटोग्राफीचा अनुभव