फोटो सौजन्य- pinterest 
धर्म

Ravivar Upay: रविवारी करा हे उपाय, तुमच्या जीवनातील सर्व समस्या होतील दूर

रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी पूजा केल्याने विशेष फळ मिळते, असे म्हटले जाते. रविवारी ब्रह्म मुहूर्तावर सूर्य देवाची प्रार्थना करणे फायदेशीर ठरते. रविवारी कोणते उपाय करायचे, जाणून घ्या

प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मामधील आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. रविवार हा सूर्य देवाला समर्पित असतो, जो जीवनाचा पाया आणि उर्जेचा स्रोत मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा आत्मा, आदर, पद, प्रतिष्ठा आणि यशासाठी जबाबदार ग्रह मानला जातो.

रविवारी केलेले उपाय सूर्यदेवाला प्रसन्न करतात. ज्यामुळे जीवनात आनंद, समृद्धी, आरोग्य आणि आदर मिळतो. रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे आणि उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. रविवारच्या दिवशी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या

रविवारच्या दिवशी करा हे उपाय

सूर्यदेवाला जल अर्पण करणे

रविवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये लाल फुले, तांदूळ आणि थोडा गूळ घाला आणि ते सूर्यदेवाला अर्पण करा. सूर्याला पाणी अर्पण करताना ओम घृण्य सूर्याय नमः या मंत्रांचा जप करावा.

लाल रंगांच कपडे परिधान करा

रविवारी लाल रंगांचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. कारण हा रंग सूर्यदेवतेचा आवडता रंग मानला जातो. तसेच यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढवते.

गूळ आणि गहूचे दान करा

असे म्हटले जाते की, रविवारी गूळ, गहू आणि लाल रंगांचे वस्त्र दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात.

तांब्याच्या भांड्यांचा वापर

रविवारच्या दिवशी तांब्याच्या भांड्यातून अन्न किंवा पाणी सेवन केल्याने तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. असे केल्याने आरोग्य चांगले राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

गरिबांना अन्न द्या

रविवारच्या दिवशी गरजू आणि गरिबांना जेवण आणि मिठाई दान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनातील समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते.

लाल फुले अर्पण करा

रविवारच्या दिवशी तुम्ही घरातील देव्हाऱ्यात सूर्यदेव किंवा भगवान विष्णूची पूजा करुन लाल फुले अर्पण करु शकतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कौटुंबिक कलह दूर होतात.

व्रत पाळा

रविवारच्या दिवशी उपवास करुन फक्त एकच वेळा जेवल्याने सूर्यदोष शांत होतो. उपवासाच्या दिवशी मीठ खाणे टाळा तर या दिवशी फळे खा.

रविवारच्या दिवशी काय करु नये

रविवारी तेल, मीठ किंवा मांस खाणे टाळा.

या दिवशी केस आणि नखे कापणे टाळा.

खोटे बोलणे, इतरांना फसवणे आणि रागावणे टाळा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!