Chhath Puja 2026 Dates (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)  
धर्म

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजा हा उत्तर भारतातील एक महत्त्वाचा आणि कठीण धार्मिक सण आहे. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती नांदावी यासाठी महिला या सणात कठोर व्रत करतात. २०२६ मध्ये छठ महापर्व १३ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान साजरे केले जाणार आहे.

Riddhi Vanne

उत्तर भारतातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात कठीण सण कोणता असेल तर तो म्हणजे छठ पूजा. पूर्वी हा सण फक्त बिहार, झारखंड आणि यूपी मधेच दिसायचा, पण आता मुंबई, दिल्ली पासून ते अमेरिकेत पण छठ मोठ्या जल्लोषात साजरी होते. Chhath Puja 2026 Dates

मुलांच्या लांब आयुष्यासाठी आणि घरात सुख-शांती राहावी म्हणून महिला 36 तास काहीही न खाता-पिता हा उपवास करतात.हिंदू कॅलेंडर प्रमाणे कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला या सणाची सुरुवात होते आणि सप्तमीच्या सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन सांगता होते. 2026 मध्ये नेमकी तारीख काय आहे, हे अनेक जण गुगलवर शोधत आहेत.

छठ पूजा 2026 ची तारीख

द्रिक पंचांग बघितले तर 2026 सालची छठ पूजा 13 नोव्हेंबर शुक्रवार पासून चालू होत आहे आणि 16 नोव्हेंबर सोमवार पर्यंत चालणार आहे. यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे 15 नोव्हेंबरचा षष्ठीचा दिवस.

पहिला दिवस 13 नोव्हेंबर - नहाय-खाय

पहिल्या दिवसाला नहाय-खाय म्हणतात. या दिवशी ज्या बायका उपवास करणार असतात त्या सकाळी नदीवर जाऊन आंघोळ करतात. घरी येऊन स्वयंपाकघर स्वच्छ करतात आणि मग सात्विक जेवण बनवतात. या दिवशी भात, दुधीची भाजी आणि हरभरा डाळ बनवण्याची जुनी पद्धत आहे. लसूण-कांदा या दिवशी अजिबात वापरत नाहीत. एकदम साधं जेवण असतं.

दुसरा दिवस 14 नोव्हेंबर - खरना

दुसऱ्या दिवसाला खरना असे म्हणतात. हा दिवस पंचमीला येतो. या दिवशी दिवसभर काहीही खाल्ले जात नाही. संध्याकाळी मातीच्या चुलीवर गुळ आणि तांदळाची खीर बनवली जाते. त्याला बऱ्याच ठिकाणी रसिया-रोटी पण म्हणतात. खीर, पोळी आणि केळीचा नैवेद्य दाखवून मग उपवास करणारी महिला प्रसाद खाते. आणि इथूनच तिचा खरा कठीण उपवास सुरु होतो. यानंतर 36 तास तिला पाणी सुद्धा प्यायचे नसते.

तिसरा दिवस 15 नोव्हेंबर - डूबते सूर्य को अर्घ्य

तिसरा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस असतो. या दिवशी संध्याकाळी बुडत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते. सगळ्या महिला नवीन साड्या नेसून, डोक्यावर टोपलीत ठेकुआ, फळे, ऊस घेऊन घाटावर जातात. कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून सूर्याला नमस्कार केला जातो. दिल्लीमध्ये या दिवशी सूर्य मावळण्याची वेळ संध्याकाळी 5:28 ची आहे. तुमच्या शहरानुसार वेळ 5-10 मिनिटे मागे-पुढे होऊ शकते.

चौथा दिवस 16 नोव्हेंबर - उगते सूर्य को अर्घ्य

हा शेवटचा आणि सांगतेचा दिवस. सकाळी लवकर उठून परत सगळे घाटावर जातात आणि उगवत्या सूर्याची वाट बघतात. सूर्य वर येताच त्याला अर्घ्य दिले जाते आणि मग सगळ्यांकडून आशीर्वाद घेऊन उपवास सोडला जातो. दिल्लीमध्ये हा सुर्यादय सकाळी 6:44 ला होईल.

थोडक्यात लक्षात ठेवा -

  • 13 नोव्हेंबर ला नहाय-खाय
  • 14 नोव्हेंबर ला खरना
  • 15 नोव्हेंबर ला संध्याकाळचा अर्घ्य
  • 16 नोव्हेंबर ला सकाळचा अर्घ्य

व्रत समाप्तीही पूजा फक्त पूजा नाही, तर निसर्गाला आणि सूर्याला थँक्यू म्हणण्याचा सण आहे.

Mira Bhayandar: फोटो-व्हिडिओसाठी महिन्याला लाखोंचा खर्च! मिरा-भाईंदर महापालिकेच्या खर्चावर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

Health tips: चुकीच्या पद्धतीने बसण्यामुळे वाढतायत मणक्याचे आजार; वेळीच सुधारा बसण्याची सवय, अन्यथा होऊ शकतात 'या' गंभीर समस्या!

Weight Loss: कंबरेचा घेर वाढला आहे? मग सकाळी नियमित प्या 'हा' आयुर्वेदिक काढा, महिनाभरात कमी होईल वजन

Maan: माणदेशच्या मातीत उलगडणार स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी प्रवास! आशुतोष गोवारीकरच्या निर्मितीचा श्रीगणेशा!

NSEL OTS Payout : NSEL One Time Settlement चे पे-आउट जारी! 14 वर्षांच्या लढ्यानंतर ऐतिहासिक तोडगा; कॉर्पोरेट भारतातील पहिलेच सेटलमेंट