थायलंडपासून इंडोनेशियापर्यंत गणपतीचा गौरव! सरकारी बोधचिन्हांपासून चलनी नोटेपर्यंत गणरायाचा ठसा 
धर्म

Sankashti Chaturthi Special: थायलंडपासून इंडोनेशियापर्यंत गणपतीचा गौरव! सरकारी बोधचिन्हांपासून चलनी नोटेपर्यंत गणरायाचा ठसा

Sankashti Chaturthi Special: गणपती बाप्पाची महती केवळ भारतापुरती मर्यादित नाही. थायलंड आणि इंडोनेशियासह अनेक देशांमध्येही गणरायाला विशेष मानाचे स्थान आहे. परदेशातील सरकारी बोधचिन्हांपासून ते चलनी नोटेपर्यंत गणपतीचा ठसा पाहायला मिळतो. संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया भारताबाहेरील गणेशभक्तीचा रंजक इतिहास.

प्राजक्ता प्रधान
  • थायलंड आणि इंडोनेशियासह अनेक आग्नेय आशियाई देशांमध्ये गणपतीला विशेष मानाचे स्थान आहे

  • थायलंडमध्ये गणपतीला 'फ्रा फिकानेत' (Phra Phikanet) या नावाने ओळखले जाते.

  • रामायण, महाभारत आणि संस्कृत भाषेतील शब्दांचा प्रभाव आजही या देशांच्या संस्कृतीत पाहायला मिळतो.

थायलंडच्या अनेक सरकारी आणि राजघराण्याशी संबंधित विभागांच्या अधिकृत बोधचिन्हांवर (प्रामुख्याने कला विभाग आणि ललित कला महाविद्यालय) तसेच इंडोनेशियातील काही शहरांच्या राजमुद्रांवर व जुन्या चलनी नोटेवर गणपतीचे चित्र आहे. एकंदरीत भारताबाहेर ही गणरायाला विषयी पूज्यभाव आजही कायम आहे हे अधोरेखित होते. या विषयाशी सविस्तर माहिती घेऊयात

राजचिन्ह, सरकारी संस्था आणि चलनावर गणपती

थायलंड (Thailand)

थायलंडचे मुख्य राष्ट्रीय राजचिन्ह 'गरुड' आहे, जे १९११ मध्ये राजा राम सहावा (Vajiravudh) यांनी अधिकृतपणे स्वीकारले. मात्र, थायलंडच्या 'ललित कला विभाग' आणि 'सिल्पाकोर्न विद्यापीठा'च्या अधिकृत राजचिन्हावर गणपतीची प्रतिमा आहे. कला, संस्कृती आणि विद्येची देवता म्हणून १९३०-४० च्या दशकात या संस्थांची स्थापना झाल्यापासून हे चिन्ह वापरले जाते.

इंडोनेशिया (Indonesia)

इंडोनेशियाचे मुख्य राष्ट्रीय राजचिन्ह देखील 'गरुड पंकसिला' (Garuda Pancasila) आहे. परंतु, तेथील ब्लिटर , सलाटिगा आणि केदिरी या तीन स्थानिक प्रशासनांच्या (शहर/जिल्हा) अधिकृत राजमुद्रेवर गणपतीचे चिन्ह आहे. तसेच, इंडोनेशियातील सर्वात जुनी तांत्रिक संस्था असलेल्या 'बांडुंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (ITB) च्या बोधचिन्हावरही १९२० च्या दशकापासून गणपती आहे. याशिवाय, १९९८ ते २००८ या काळात इंडोनेशियाच्या २०,००० रुपयांच्या चलनी नोटेवर गणपतीचे चित्र छापले गेले होते.

या देशांमध्ये गणपतीचे पूजन केले जाते का?

या देशांमध्ये आजही गणपतीचे अनन्यसाधारण महत्त्व आणि पूजन पाहायला मिळते. थायलंड येथे गणपतीला 'फ्रा फिकानेत' (Phra Phikanet) नावाने ओळखले जाते. थायलंड हा बौद्ध बहुल देश असला तरी, तेथील राजघराणे आणि सामान्य नागरिक कोणत्याही शुभ कार्याची, व्यवसायाची किंवा कला क्षेत्रातील कामाची सुरुवात करताना गणपतीची पूजा करतात. बँकॉकच्या सेंट्रल वर्ल्ड प्लाझाबाहेर आणि 'वाट समन रतनाराम' (Wat Saman Rattanaram) मंदिरात गणपतीची भव्य मूर्ती असून तेथे दररोज मोठी गर्दी होते. गणेश चतुर्थीचा उत्सवही येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. येथे बहुसंख्य लोक इस्लाम धर्माचे पालन करत असल्याने सर्वसाधारणपणे गणपतीची धार्मिक पूजा होत नाही, परंतु त्यांना 'ज्ञान, बुद्धी आणि शिक्षणाचे प्रतीक' मानून अत्यंत आदराचे स्थान दिले जाते. मात्र, इंडोनेशियातील बाली (Bali) बेटावर बहुसंख्य लोक हिंदू असल्याने तेथे घरोघरी आणि मंदिरांमध्ये गणपतीची विधिवत पूजा केली जाते. तसेच जावा बेटावरील 'माउंट ब्रोमो' या ज्वालामुखीच्या मुखाशी रक्षणकर्ता म्हणून गणपतीची मूर्ती स्थापित आहे. तसेच कंबोडिया, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, आणि अगदी जपानमध्येही ('कांगितेन' - Kangiten या नावाने) गणपतीचे पूजन करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.

ऐतिहासिक सत्य

हे देश थेट राजकीयदृष्ट्या प्राचीन भारताच्या साम्राज्याचा (जसे की मौर्य किंवा गुप्त साम्राज्य) प्रशासकीय भाग नव्हते, परंतु सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या हा संपूर्ण प्रदेश 'बृहत्तर भारत' म्हणून ओळखला जात असे. येथील सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध हे सुमारे इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापासून ते १५ व्या शतकापर्यंत दक्षिण भारतातील राजे (विशेषतः पल्लव, चोळ आणि पांड्य) आणि व्यापाऱ्यांनी आग्नेय आशियातील (थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम) देशांशी सागरी मार्गाने घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले. भारतीय संस्कृतीच्या प्रभावातून या देशांमध्ये अनेक शक्तिशाली हिंदू आणि बौद्ध साम्राज्ये उदयास आली. उदा. इंडोनेशियातील श्रीविजय आणि मजापहित साम्राज्य, कंबोडियातील अंगकोर साम्राज्य, आणि थायलंडमधील अयुथया साम्राज्य, ज्याचे नाव प्रभू श्रीरामांच्या 'अयोध्येवरून' ठेवले गेले होते.

चोळ साम्राज्याचा प्रभाव

११ व्या शतकात दक्षिण भारतातील सम्राट राजेंद्र चोळ यांनी आरमाराच्या जोरावर आग्नेय आशियातील श्रीविजय साम्राज्यावर (आजचा इंडोनेशिया व मलेशियाचा भाग) विजय मिळवला होता.

भाषा आणि संस्कृतीचा वारसा

या देशांनी भारतीय संस्कृतीचा स्वीकार कोणत्याही सक्तीशिवाय स्वेच्छेने केला. त्यामुळे आजही तेथील भाषांमध्ये संस्कृत आणि पाली शब्दांचा मोठा भरणा आहे. उदाहरणार्थ, इंडोनेशियाच्या चलनाचे नाव 'रुपिया' (Rupiah) हे संस्कृत शब्द 'रौप्य' किंवा 'रुप्यकम्' वरून आले आहे, आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रीय एअरलाईन्सचे नाव 'गरुड इंडोनेशिया' आहे. तसेच रामायण आणि महाभारताचे स्थानिक रूपांतर आजही तेथील नृत्य, नाट्य आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

IND vs NZ 2nd Test: 3 ओव्हर्समध्ये लागोपाठ 3 विकेट्स, भारताच्या गोलंदाजांची घातक खेळी, न्यूझीलंडवर ताण

भटकी कुत्री मागे लागताच जीवाच्या आकांताने पळाला अन्... अवघ्या १८ वर्षांच्या बारावीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने

HMD चा बजेट फ्रेंडली धमाका! AI असिस्टेंटसह भारतात नवा स्मार्टफोन लाँच... वाचा फीचर्स

National Organ Donation Day 2026: मृत्यूनंतरही जिवंत राहण्याची संधी; जाणून घ्या 27 नोव्हेंबरच्या 'राष्ट्रीय अवयवदान दिना'चे महत्त्व

Congress Politics:काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? 24 दिवसांत महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनीता गांवडे यांची नियुक्ती रद्द