तळहातावरील जीवनरेषा तुटलेली किंवा छोटी असण्याचा काय आहे अर्थ 
धर्म

Palmistry: तळहातावरील जीवनरेषा तुटलेली किंवा छोटी असण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या हस्तरेखाशास्त्रातील महत्त्व

Palmistry: हस्तरेषाशास्त्रात तळहातावरील जीवनरेषेला विशेष महत्त्व दिले जाते. अनेकांच्या हातावर ही रेषा छोटी, तुटक किंवा अपूर्ण दिसते. त्यामुळे अशा व्यक्तींचे आयुष्य कमी असते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घेऊया हस्तरेषाशास्त्रानुसार जीवनरेषेचा अर्थ आणि त्यामागील मान्यता.

प्राजक्ता प्रधान
  • हस्तरेषाशास्त्रात जीवनरेषेला विशेष महत्त्व दिले जाते

  • जीवनरेषा अंगठा आणि तर्जनी यांच्या मधल्या भागातून सुरू होते.

  • हस्तरेषाशास्त्रानुसार जीवनरेषेचा संबंध आरोग्य, ऊर्जा आणि जीवनातील बदलांशी जोडला जातो.

Palmistry: हस्तरेषाशास्त्रात तळहातावरील जीवनरेषेला विशेष महत्त्व दिले जाते. अनेकांच्या हातावर ही रेषा छोटी, तुटक किंवा अपूर्ण दिसते. त्यामुळे अशा व्यक्तींचे आयुष्य कमी असते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घेऊया हस्तरेषाशास्त्रानुसार जीवनरेषेचा अर्थ आणि त्यामागील मान्यता.

हस्तरेषाशास्त्रात तळहातावरील प्रत्येक रेषेला विशेष महत्त्व दिले जाते. त्यापैकी जीवनरेषा ही सर्वाधिक चर्चेत असणारी रेषा आहे. अनेकांच्या हातावर ही रेषा लांब, तर काहींच्या हातावर छोटी किंवा तुटक दिसते. त्यामुळे जीवनरेषा छोटी असेल तर व्यक्तीचे आयुष्य कमी असते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, हस्तरेषाशास्त्रातील मान्यता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामध्ये फरक आहे. तळहातावरील जीवनरेषा तुटलेली किंवा छोटी असण्याचा अर्थ काय? त्याचा काय आहे संबंध जाणून घ्या

तळहातावर जीवनरेषा कुठे असते

तुमच्या तळहातातील जीवनरेषा तर्जनी आणि अंगठ्याच्या मधून सुरू होते आणि अंगठ्याच्या खालून मनगटापर्यंत जाते. याला जीवनरेषा म्हणतात. जर जीवनरेषा स्पष्ट, सुस्पष्ट आणि कमी जाड असेल, तर ते शुभ मानले जाते. जर ती तर्जनी आणि अंगठ्याच्या मधून, मंगळाच्या भागातून निर्दोषपणे सुरू होऊन मनगटापर्यंत पसरली असेल, तर असे लोक दीर्घायुषी होण्याची शक्यता असते.

जीवनरेषा कट होत असल्याची चिन्हे

जर तुमच्या जीवन रेषेवर कापल्याची किंवा क्रॉसची खूण असेल, तर तुम्हाला त्या वयात आरोग्याच्या समस्या किंवा जीवनाशी संबंधित अडचणी येऊ शकतात. कुटुंबात एखाद्या मोठ्या व्यक्तीचे निधन होऊ शकते किंवा नातेसंबंधांमध्ये बिघाड होऊ शकतो. ही खूण एक चेतावणी चिन्ह म्हणून काम करते.

लहान किंवा अपूर्ण जीवनरेषा

एखाद्या व्यक्तीची जीवनरेषा लहान किंवा अपूर्ण असण्याचा अर्थ काय होतो? लोक सामान्यतः म्हणतात की अशा हातावरील व्यक्तीचे आयुष्य कमी असते. तळहातावरील या स्थितीचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीचे आयुष्य कमी असेल, म्हणजेच ती व्यक्ती फक्त काही वर्षेच जगेल. हे चुकीचे आहे.

ज्यावेळी एखाद्याच्या हातावरील जीवनरेषा लहान किंवा अपूर्ण असते, तेव्हा हृदयरेषेचीही तपासणी केली जाते. हस्तशास्त्रानुसार, वय केवळ जीवनरेषेवरूनच नव्हे, तर हृदयरेषेवरूनही मोजले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या हातातील हृदयरेषा चांगली, विकसित आणि स्पष्ट असेल, तर ती व्यक्ती दीर्घायुष्य जगण्याची शक्यता असते.

वय मोजण्याच्या पद्धती

हृदय रेषेव्यतिरिक्त, मनगट, जीवन रेषेशी जोडलेली मंगळ रेषा आणि आरोग्य रेषेवरूनही वय मोजले जाते.

मनगटावर एक रेघ असल्यास ती व्यक्ती २५ ते ३० वर्षांची मानली जाते. त्याचप्रमाणे, दोन रेघ ४५ ते ५५ वर्षे वयाचे द्योतक आहेत. तीन रेघ ७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे द्योतक आहेत. जर चार रेघ असतील, तर ती व्यक्ती ८५ ते १०० वर्षे जगू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

ASCI Report 2026 : सोशल मीडियाच्या जाहिरातीवरून वस्तू खरेदी करताय? थांबा! फसवणुकीचे प्रमाण 98 % वर; ASCI चा धक्कादायक रिपोर्ट

Sambhajinagar Sanskrit Camp : संस्कृत भाषेतून करिअरच्या संधी; संभाजीनगरमध्ये ८० विद्यार्थ्यांनी घेतले संस्कृतचे धडे

Raigad News: म्हसळ्यातील ६ गावांना पाणीटंचाईचा धोका? मेंदडी धरणाच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरु, गाळ उपशाचे निर्देश

शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता उद्योजकतेच्या संधींचे क्षेत्र म्हणून पाहा : सुनेत्रा पवार

Dry skin: थंडीत कोरड्या त्वचेवर महागड्या क्रीम लावण्याऐवजी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचा होईल मुलायम