Vastu Tips: चुकूनही कोणाला भेट म्हणून देऊ नका या वस्तू 
धर्म

Vastu Tips: चुकूनही कोणाला भेट म्हणून देऊ नका या वस्तू, नात्यांमध्ये येऊ शकतो दुरावा

Vastu Tips: वाढदिवस, लग्न किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी प्रियजनांना भेटवस्तू देऊन आनंद व्यक्त करतो. मात्र वास्तुशास्त्रात काही वस्तू भेट म्हणून देणे अशुभ मानले जाते. अशा भेटवस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कोणत्या वस्तू भेट म्हणून देऊ नये जाणून घ्या

प्राजक्ता प्रधान
  • वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू भेट म्हणून देणे टाळावे

  • भेटवस्तू देताना समोरच्या व्यक्तीची आवड आणि गरज लक्षात घ्यावी.

  • भेटवस्तू देण्यामागील भावना आणि आपुलकीला अधिक महत्त्व असते.

विशेष प्रसंगी प्रियजनांना भेटवस्तू देणे हा प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. लग्न, वाढदिवस किंवा इतर समारंभांमध्ये, लोक आपापल्या आवडीनिवडी आणि भावनांनुसार भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. दरम्यान, वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू भेट देण्यासाठी अशुभ मानल्या जातात. असे मानले जाते की अशा भेटवस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कोणत्या वस्तू भेट म्हणून देऊ नये जाणून घ्या

पर्स

वास्तुशास्त्रानुसार, पर्स भेट देणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की पर्स संपत्ती आणि आर्थिक समृद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे, पर्स भेट दिल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणून, जर तुम्हाला पर्स भेट द्यायची असेल, तर त्यात एक नाणे किंवा नोट नक्की ठेवा. श्रद्धेनुसार पैशाचा आणि समृद्धीचा अखंड प्रवाह दर्शवते.

परफ्यूम

जरी परफ्यूम ही एक आवडती आणि सुंदर भेट मानली जात असली तरी, वास्तुशास्त्रानुसार ते भेट देणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की, परफ्यूमच्या सुगंधाप्रमाणे नात्यांमधील गोडवा हळूहळू कमी होऊ शकतो. काही समजुतीनुसार याचा संबंध आर्थिक अडचणी आणि पैशाच्या कमतरतेशी देखील जोडतात.

काळ्या रंगांच्या वस्तू

काळा रंगांचा संबंध नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. त्यामुळे, काळ्या रंगाचे कपडे, घड्याळे किंवा बूट भेट म्हणून देणे टाळावे. असे मानले जाते की या रंगाच्या वस्तू भेट दिल्याने नात्यांमध्ये तणाव आणि दुरावा वाढू शकतो. शिवाय, यामुळे घरातील सकारात्मक वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो, असेही मानले जाते.

मोती

मोती त्यांच्या सौंदर्यामुळे आणि चमकमुळे अत्यंत मौल्यवान मानले जातात, परंतु वास्तुशास्त्र आणि पारंपरिक समजुतींनुसार, ते अश्रू आणि भावनांशी संबंधित आहेत. असे मानले जाते की कोणाला मोती भेट दिल्याने दुःख, भावनिक त्रास किंवा नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. याच कारणामुळे, काही समजुतींनुसार मोती अशुभ मानले जातात, म्हणून कोणालाही ते भेट देणे टाळले जाते.

रुमाल

वास्तुशास्त्रानुसार, रुमाल हे दुःख आणि अश्रूंचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे रुमाल भेट देणे अशुभ मानले जाते. असे केल्याने भावनिक तणाव, गैरसमज आणि नात्यांमध्ये दुरावा वाढू शकतो, अशी श्रद्धा आहे. विशेषतः जवळच्या नात्यात रुमाल भेट देणे टाळावे, जेणेकरून प्रेम, विश्वास आणि गोडवा टिकून राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Maharashtra Cabinet Decisions: राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! ४२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य

Weather Update : राज्यातील हवामान राहणार संमिश्र; कुठं थंडी तर कुठं उष्णतेची लाट मिळणार अनुभवायला

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: 24 तासांत तब्बल 10 हजारांनी घसरला प्रति किलो चांदीचा भाव, सोन्याचे दरही उतरले...

Winter Food: शरीरातील प्रत्येक अवयव होईल तृप्त! हिवाळ्यात डाळ खिचडीसोबत आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश