Abhishek Thakur Trophy  ‘अभिषेक ठाकुर करंडक‌’ आंतरक्लब खुला गट टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा
Sports

पुण्याच्या क्रिकेट मैदानात MES क्लबचा दबदबा! अभिषेक ठाकुर करंडक स्पर्धेत विजयांची हॅट्ट्रिक

अनिकेत बावणे क्रिकेट ॲकॅडमीने १८९ धावांचे लक्ष्य उभे केले होते. हे लक्ष्य एमईएस क्लबने १५.२ षटकात सहज पूर्ण केले.

तेजस भागवत
  • ‘अभिषेक ठाकुर करंडक‌’ आंतरक्लब खुला गट टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा

  • सांघिक कामगिरीने ‘एमईएस’ची विजयी हॅट्ट्रीक

  • दुसऱ्या सामन्यात हर्ष ओस्वालच्या 64 रन्स

Cricket News: पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने आयोजित कै. अभिषेक ठाकुर यांच्या स्मरणार्थ आठव्या ‘अभिषेक ठाकुर करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत एमईएस क्लब संघाने प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयांची हॅट्ट्रीक नोंदवली.

येवलेवाडी (Pune) येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌स ॲकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात यश बोरामणी याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर एमईएस क्लबने अनिकेत बावणे क्रिकेट ॲकॅडमीचा सात गडी राखून पराभव केला. अनिकेत बावणे क्रिकेट ॲकॅडमीने १८९ धावांचे लक्ष्य उभे केले होते. हे लक्ष्य एमईएस क्लबने १५.२ षटकात सहज पूर्ण केले. यश क्षीरसागर (नाबाद ६३ धावा), हर्ष संघवी (नाबाद ४९ धावा) आणि यश बोरामणी (४९ धावा) यांनी संघाचे लक्ष्य पूर्ण केले.

दुसऱ्या सामन्यात हर्ष ओस्वाल याने केलेल्या नाबाद ६४ धावांच्या जोरावर एमईएस संघाने स्केल-अप ॲकॅडमीचा सात गडी राखून पराभव केला व सलग दुसरा विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात यश क्षीरसागत याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर एमईएस संघाने मुंबईच्या मुंडे स्पोर्ट्‌स संघाचा ८३ धावांनी पराभव केला. यश क्षीरसागर याच्या नाबाद ७८ धावा आणि हर्ष संघवी याच्या ७१ धावांच्या मदतीने एमईएस क्लबने २२४ धावांचा डोंगर उभा केला होता. याला उत्तर देताना मुंडे स्पोर्ट्‌स संघाचा डाव १४१ धावांवर मर्यादित राहीला.

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरी

अनिकेत बावणे क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १८९ धावा (चंद्रकांत सरोज ६६ (४३, २ चौकार, ७ षटकार), मयांक कश्यप ४१, सौरभ दरेकर ३३, वैभव दरकुंडे २-१९, वेरूण चोदरी २-२३, यश बोरामणी २-३०) पराभूत वि. एमईएस क्लबः १५.२ षटकात ३ गडी बाद १९० धावा (यश क्षीरसागर नाबाद ६३ (३४, ६ चौकार, ३ षटकार), हर्ष संघवी नाबाद ४९, यश बोरामणी ४९);

सामनावीरः यश बोरामणी

स्केल-अप ॲकॅडमीः २० षटकात ८ गडी बाद १२२ धावा (स्वप्निल लडकत नाबाद ४७, अनुज जगदाळे २८, अनिकेत इंद्रजीत ३-१०, वैभव दरकुंडे ३-१४) पराभूत वि. एमईएस क्लबः ९.३ षटकात ३ गडी बाद १२३ धावा (हर्ष ओस्वाल नाबाद ६४ (२९, ९ चौकार, ३ षटकार), सुहेल श्रीखंडे १९, दिपक तिडके २-२२);

सामनावीरः हर्ष ओस्वाल

Cricket News: हरी सावंतने मारलं मैदान! 3 विकेट्स अन्…; PCMC करंडकवर ‘विन टेंपल’ने कोरले नाव

एमईएस क्लबः २० षटकात ८ गडी बाद २२४ धावा (यश क्षीरसागर नाबाद ७८ (४३, ६ चौकार, ४ षटकार), हर्ष संघवी ७१ (३५, ४ चौकार, ७ षटकार), अश्विन शेळके ३-३१, अनुराग मिश्रा ३-३६) वि.वि. मुंडे स्पोर्ट्‌स-मुंबईः १५.३ षटकात १० गडी बाद १४१ धावा (श्रेयश कुमार ४०, सय्यद मोहम्मद २९, मोईन खान २०, वैभव दरकुंडे २-१३, सौरभ दोडके २-१४);

सामनावीरः यश क्षीरसागर

अभिषेक ठाकुर करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोणाच्यावतीने करण्यात आले आहे?

आठव्या अभिषेक ठाकुर करंडक आंतरक्लब खुल्या गटाच्या टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिषेक ठाकुर करंडक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघाने विजयांची हॅट्ट्रिक नोंदवली?

आठव्या अभिषेक ठाकुर करंडक क्रिकेट स्पर्धेत एमईएस क्लब संघाने प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत विजयांची हॅट्ट्रिक नोंदवली.

ना शेकोटी, ना हीटर! हात गरम ठेवणारे भन्नाट पॉकेट गॅझेट

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल