-पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीग (फोटो- सोशल मिडिया) 
Sports

१९ बॉल्समध्ये ४६ रन्स अन्...! संदीप देवलच्या अष्टपैलू जोरावर युबीएसचा बार्कलेजवर दणदणीत विजय

Cricket: दुसऱ्या सामन्यात उद्धव थिटे (१-१४ व ४१ धावा) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्प्रिंगर नेचर संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला.

तेजस भागवत
  • युबीएस, स्प्रिंगर नेचर संघांची विजयी सुरुवात
  • पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीगला दणक्यात सुरूवात 
  • प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून संघांची विजयी सुरुवात 

पुणे/Cricket League: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीग २०२६’ स्पर्धेत युबीएस, स्प्रिंगर नेचर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सुरुवात केली. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदान, थेरगाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत संदीप देवल (४६ धावा व ३-२०) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या (Pune) जोरावर युबीएस संघाने बार्कलेज संघाचा १८ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात उद्धव थिटे (१-१४ व ४१ धावा) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्प्रिंगर नेचर संघाने किर्लोस्कर ब्रदर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला.

साखळी फेरी

युबीएस : २० षटकांत ५ बाद १७६ धावा (संदीप देवल ४६ (१९ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार), प्रवीण सिंग नाबाद २४, जी. मुरली कार्तिक २४, हरप्रीत सिंग १९, सागर घरू नाबाद १८, उत्कर्ष सिन्हा १-१३, दीपक कौल १-१७) वि.वि. बार्कलेज : १९.२ षटकांत सर्व बाद १५८ धावा (अभिषेक झा ४६ (४४ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), शिवाजी अंकीपल्ली २७ (४ चौकार, १ षटकार), अजिंक्य २०, संदीप देवल ३-२०, प्रितेश मालवीया २-३१). सामनावीर : संदीप देवल. युबीएस १८ धावांनी विजयी.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजयकिर्लोस्कर ब्रदर्स : २० षटकांत सर्व बाद १२० धावा (विश्वनाथ सुतार २८, संतोष दिघे २२, प्रितेश पटेल १६, प्रेमजीत पाटील ३-२३, भूषण तांदळे २-२९, उद्धव थिटे १-१४) पराभूत वि. स्प्रिंगर नेचर : १५.५ षटकांत ३ बाद १२४ धावा (उद्धव थिटे ४१ (३१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार), पियुष पाटील नाबाद ३०, जयप्रकाश शिरोळे १८, अजय पऱ्हाळकर नाबाद १३, राहुल मोरबाळे २-२४). सामनावीर : उद्धव थिटे. स्प्रिंगर नेचर ७ गडी राखून विजयी.

‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

रायझिंग स्टार स्पोर्ट्‌‍स तर्फे आयोजित ‌‘रायझिंग स्टार करंडक‌’ प्रौढ गटाच्या (५० वर्षावरील) टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने रायझिंग स्टार रेड संघापेक्षा उत्तम सरासरी धावगती राखत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्‌‍स ॲकॅडमी येथे झालेल्या या स्पर्धेत धीरज कुमार याने फटकावलेल्या ८० धावांच्या जोरावर रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने रायझिंग स्टार यलो संघाचा ४१ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

पहिल्यांदा खेळणाऱ्या रायझिंग स्टार ब्ल्यु संघाने १९१ धावांचे लक्ष्य उभे केले. धीरज कुमार याने ५१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. निलेश सामंत याने ३८ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना रायझिंग स्टार यलो संघाचा डाव १५० धावांवर मर्यादित राहीला.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी; दक्षिण कोरियामध्ये करणार प्रतिनिधित्व

Business News : फ्लिपकार्टमध्ये मोठा नेतृत्वबदल; CEO कल्याण कृष्णमूर्ती पद सोडणार; ११ वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम

Viral Knife Attack Video : हळदी समारंभात पत्रकारावर चाकूने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

Dharashiv Water Storage : धाराशिवचा पाणीसाठा 5.14 टक्क्यांवर; आठ महिन्यांचे नियोजन करा! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Khamgaon: कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात! CCI केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा कायम; खासगी व्यापाऱ्यांकडून ५० हजार क्विंटल खरेदी