Vijay Merchant Trophy : डीडीसीएने मुंबईविरुद्ध विजय मर्चंट ट्रॉफीविरुद्धच्या सामन्यासाठी जाहीर केला संघ (फोटा सौजन्य : आयएएनएस) Vijay Merchant Trophy : डीडीसीएने मुंबईविरुद्ध विजय मर्चंट ट्रॉफीविरुद्धच्या सामन्यासाठी जाहीर केला संघ (फोटा सौजन्य : आयएएनएस)
Sports

Vijay Merchant Trophy : डीडीसीएने मुंबईविरुद्ध विजय मर्चंट ट्रॉफीविरुद्धच्या सामन्यासाठी जाहीर केला संघ

विजय मर्चंट ट्रॉफी 2026-27 स्पर्धेसाठी डीडीसीएने दिल्लीच्या 16 सदस्यीय अंडर-16 संघाची घोषणा केली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात पार्थ डबास संघाचे नेतृत्व करणार असून युवीश सिंहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा सामना ग्वाल्हेरमध्ये रंगणार आहे.

Rakesh Khedekar
  • पार्थ डबासवर संघाची जबाबदारी

  • सहा गटात अनेक दमदार संघ

  • ग्वाल्हेरमध्ये रंगणार सामना

Vijay Merchant Trophy : दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए)ने मंगळवारी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. पार्थ डबास मुंबईविरुद्ध होणाऱ्या विजय मर्चंट ट्रॉफी 2026-27 सामन्यासाठी दिल्ली अंडर-16 संघाचं नेतृत्त्व करेल.

बुधवारी 25 नोव्हेंबरपासून ग्वाल्हेरमध्ये हा सामना खेळवला जाईल. गट फेरीतील सामने 14 पासून सुरू झाले होते. ग्वाल्हेरमध्येच हे सामने खेळवले जात आहेत. संघाला ज्यूनियर मेन्स सिलेक्शन कमिटीने 23 नोव्हेंबरला डीडीसीए परिसरमध्ये झालेल्या बैठकीत फायनल केले.

पार्थ डबासवर संघाची जबाबदारी

डबासला संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे, तर युवीश सिंह उपकर्णधार असेल. सिंह हा यष्टीरक्षकाच्या रुपातही संघात जबाबदारी सांभाळेल. रिवान वीर भयानाला देखील यष्टीरक्षकाच्या रुपात संघात समाविष्ट करण्यात आले आहे. निवड समितीच्या बैठकीत मयंक सिदाना (व्यवस्थापक), अभिषेक शर्मा (सिलेक्टर), योगेश नागर (सिलेक्टर), रॉबिन सिंह ज्यूनियर (मेंबर, सीएसी-डीडीसीए), राजू शर्मा (मुख्य प्रशिक्षक) आणि अशोक शर्मा (सचिव) यांचा समावेश होता.

विजय मर्चंट ट्रॉफी एक स्थानिक वयोयगट स्पर्धा आहे, ज्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयोजित करते. वेगवेगळ्या राज्यातील एकूण 36 संघ यात भाग घेतात. संघात एकूण सहा संघांना गटात विभागण्यात आले होते. गट 'सी' चे सामने शिवमोग्गामध्ये खेळवले जातील.

सहा गटात अनेक दमदार संघ

एलीट 'ए' गटात मुंबई, आंध्र, तामिळनाडू, केरळ, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आहेत. 'बी'मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान, उत्तराखंड आणि गोवा यांचा समावेश आहे. एलीट 'सी' मध्ये हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, हैदराबाद, ओडिशा आणि चंडीगड, तर एलीट 'डी'मध्ये आसाम, मध्य प्रदेश, बडोदा, झारखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश हे आहेत. एलीट 'ई' गटात पंजाब, विदर्भ, बंगाल, सौराष्ट्र, पोद्दुचेरी आणि बिहार, तर प्लेट ग्रुपमध्ये मणिपुर, मिझोरम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मेघालय यांचा समावेश आहे.

दिल्ली अंडर-16 संघ : पार्थ डबास (कर्णधार), युवीश सिंह (उप कर्णधार आणि यष्टीरक्षक), सक्षम यादव, शिवांश सिंह, आरुष यादव, अर्नव शर्मा, रिवान वीर भयाना (विकेटकीपर), क्षितिज सेहरा, वेदांत गुप्ता, शौर्य चांदना, मनन माथुर, प्रणय शर्मा, अहान गर्ग, गीतांक लखेरा, यश माहेश्वरी आणि नैतिक सिंह.

Breakup & Moving On: ब्रेकअपनंतर स्वतःला कसे सावराल? नात्यातून बाहेर पडण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

Milk Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! शेतकऱ्यांच्या मागणीमुळे ग्राहकांचं वाढलं टेन्शन; दूध आणखी महागणार?

Sheikh Hasina : शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार? दिल्लीतून ढाक्याला जाण्यासाठी केली सरकारी विमानाची मागणी

Bisleri Success Story : 'बिसलेरी' कसा बनला भारतातील सर्वात मोठा ब्रँड? अवघ्या 4 लाखांत खरेदी केलेली कंपनी आज अब्जावधींची; काय आहे कमाल कहाणी ?

WhatsApp Tips: खासगी चॅट्सच्या प्रायव्हसीबाबत चिंता? असे सेट करा फिंगरप्रिंट लॉक, सोपी आहे प्रोसेस