Sports

रिंकूचे यश दयालला शेवटचे 5 विजयी षटकार; आयपीएलमध्ये षटकार देणाऱ्या गोलंदाजांचे काय झाले? : जाणून घ्या सविस्तर

यश दयाल याच्याप्रमाणेच अनेक आयपीएल गोलंदाज आहेत ज्यांना एका षटकात 5 षटकार मारले आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत ते गोलंदाज आणि ते सध्या काय करीत आहेत. कारण शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार दिल्यानंतर पराभवाचे खापर त्यांच्यावर पडत असे, त्या्मुळे त्यांच्या कारकिर्दीवर विलक्षण परिणाम पडत असे. जाणून घेऊया त्यांच्या करिअरवर त्याचा काय परिणाम झाला.

Sunil Chavan
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग ( indian premier leage ) आयपीलच्या 2023 ( IPL 2023 ) हंगामातील सर्वात ( Yash Dayal of Gujrat ) रोमांचक सामना रविवारी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकताने दडफदार फलंदाजी करीत विजय खेचून आणला. या सामन्याचा गेम चेंजर ठरला रिंकू सिंग. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात 5 षटकार ठोकत गुजरातच्या घशातून विजय खेचून आणला. या सामन्यात रिंकू सिंगने जे केले ते आजपर्यंत कोणी करू शकले नाही. रिंकूने ओव्हरच्या शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार ठोकले.
आयपीएल 2012 : राहुल शर्मा ख्रिस गेलचा ठरला बळी :
17 एप्रिल 2012 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुणे वॉरियर्सने 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. 13व्या षटकासाठी आलेल्या राहुल शर्माच्या पहिल्या चेंडूवर सौरभ तिवारीने एकच धाव घेतली तेव्हा स्ट्राईक ख्रिस गेलला दिली. यानंतर गेलने सलग 5 षटकार ठोकत राहुल शर्माच्या गोलंदाजीचा चुराडा केला. आयपीएल 2011 मध्ये 16 विकेट्स घेणाऱ्या राहुलची कारकीर्द रुळावरून घसरली आणि नंतर संपुष्टात आली.
आयपीएल 2020 : राहुल तेवतियाने शेल्डन कॉट्रेलला केले उद्ध्वस्त : 
आयपीएल 2020 मध्ये पंजाबने 223 धावांचे लक्ष्य दिले, तेव्हा राजस्थान संघ गुडघे टेकणार असे वाटत होते. राहुल तेवतियाही संघर्ष करीत होता, त्याने 23 चेंडूत 17 धावा केल्या. चाहत्यांची निराशा झाली, पण राहुल तेवतियाला इतर गोष्टी करायच्या होत्या. त्याने पंजाब किंग्जच्या शेल्डन कॉट्रेलला 5 षटकार ठोकून सामन्याचा रंगच बदलून टाकला. विकेट घेतल्यानंतर सॅल्युट सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध असलेल्या कॉटरेलला आयपीएलमध्ये पुन्हा तसा मान मिळाला नाही.
आयपीएल 2021 : रवींद्र जडेजाने ठोकले हर्षल पटेलला उत्तुंग षटकार :
या सीझनमध्ये हर्षल पटेलची तुती बोलत होती आणि रवींद्र जडेजाही काही कमी नव्हता. आरसीबी आणि सीएसके यांच्यात सामना होता. 19व्या षटकापर्यंत सीएसकेने 153 धावा केल्या होत्या आणि जडेजा 21 चेंडूत 26 धावांवर खेळत होता. हर्षल पटेल शेवटचे षटक टाकायला आला तेव्हा जडेजाने त्याला पाठीमागे 5 षटकार ठोकले. चेन्नईने 4 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावांपर्यंत मजल मारली. हर्षलने या मोसमात सर्वाधिक 32 विकेट घेतल्या होत्या. या मोसमातही तो आरसीबीचा एक भाग आहे.

Pune FDA Raid: पुण्यात अन्न सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर! ९६ आस्थापनांची तपासणी, 'इतके' लायसन्स रद्द

Republic Day 2027 आधीच महाराष्ट्राच्या NCC कॅडेट्सची अडचण; 'इतक्या' कोटींचा निधी रखडला

CWG 2030 पूर्वी अहमदाबादमध्ये 800 स्मार्ट बसथांबे; मेट्रो, बीआरटीएस आणि एएमटीएससाठी एकच तिकीट व्यवस्था

'झालं बाबा एकदाचं लग्न...' संतोष जुवेकरने दिली आनंदाची बातमी; VIDEO पाहून चाहतेही खुश

Pune Metro आता थांबणार नाय! 'या' मार्गावर दररोज ५० हजार प्रवाशांचा प्रवास