IND vs NZ 2nd Test Day 3 Stumps 
Sports

IND vs NZ: किवींनी भारताचा खेळ बिघडवला! तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दबदबा; दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया बॅकफूटवर

IND vs NZ 2nd Test Day 3 Stumps: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी किींनी वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडने सामन्यावरील आपली पकड अधिक घट्ट केली असून भारताला बॅकफूटवर ढकलले आहे.

Priyanka Mundinkeri
  • भारतीय फलंदाजांची शरणागती

  • न्यूझीलंडकडे २४३ धावांची आघाडी

  • चौथा दिवस ठरणार निर्णायक

IND vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचा तिसरा दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर किवी संघाने भारताला पराभवाच्या उंबरठ्यावर ढकलले असून सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे.

तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज ढेपाळले. भारताने १३० धावांत चार विकेट्स गमावले. टीम इंडियाकडून ध्रुव जुरेलने ८८ धावांची खेळी करून फॉलो-ऑनचे संकट टाळले. परंतु, न्यूझीलंडने भारताचा डाव २४६ धावांवर गुंडाळला आणि ११० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आपली ताकद दाखवली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किवी संघाने तीन विकेट्स गमावून १३३ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडने एकूण आता २४३ धावांची आघाडी घेतली आहे.

किवी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज गारद

टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी ११६/६ या धावसंख्येवरून आपला डाव पुन्हा सुरू केला. दुसऱ्या दिवशी, एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत हे सर्व अपयशी ठरले. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत, भारताच्या फलंदाजांनी ९० धावा जोडल्या आणि दोन विकेट्स गमावले.

ध्रुव जुरेलने चांगली फलंदाजी करत आकाश दीपसोबत आठव्या विकेटसाठी ४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आकाशने ५२ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. जुरेलने आपल्या खेळीत १४ चौकारांसह १७० चेंडूंमध्ये ८८ धावा केल्या. तो टीम इंडियाकडून बाद होणारा शेवटचा खेळाडू होता. जसप्रीत बुमराह १७ चेंडूंमध्ये ४ धावा करून नाबाद राहिला.

न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर

न्यूझीलंडची एकूण आघाडी आता २४३ धावांची झाली आहे. किवी संघ सामन्यात मजबूत स्थितीत दिसत आहे. रचिन रवींद्र ४६ धावांवर नाबाद आहे, तर डॅरिल मिचेल ५ धावांवर आहे. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने १२ षटकांत ३४ धावा देऊन दोन विकेट्स घेतले आहेत. पहिल्या डावात त्याला एकही विकेट मिळाला नव्हता.

बुमराहने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला ८ धावांवर बाद केले. यानंतर, बुमराहने ४२ चेंडूंमध्ये २२ धावा करणाऱ्या हेन्री निकोल्सलाही बाद केले. डेव्हन कॉनवेने आपल्या खेळीत ६ चौकारांसह ९७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. आता सर्वांचे लक्ष चौथ्या दिवसावर लागले आहे. भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांना बाद करून सामन्यात पुनरागमन करावे लागेल.

बिजवाई सोयाबीनला ८ हजारावर भाव! चार वर्षांनंतर सोयाबीनला सोन्याची झळाळी; शेतकऱ्यांना दिलासा

Iran : इराणची युद्धनीती जगात भारी! अमेरिकेला मात देण्यासाठी वापरले इलॉन मस्कचेच तंत्रज्ञान; स्टारलिंकचा वापर करून उडवले US Air Base

म्युझिक लव्हर्सना गिफ्ट द्यायचंय? हेडफोनपासून स्पीकरपर्यंत... 'हे' गॅझेट्स ठरतील बेस्ट पर्याय

डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी; 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा

Sainik School Bharti : १०वी उत्तीर्ण ते पोस्ट ग्रॅज्युएटसाठी सुवर्णसंधी! सैनिक स्कूलमध्ये 'या' पदांवर भरती सुरू