Ishan Kishan 
Sports

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला 'हा' मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

Ishan Kishan hit 50 sixes in calendar year Ind vs Wi: ईशान किशनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ४३ धावांची खेळी करून आणखी एक मोठी कामगिरी केली.

प्रियंका मुंदिनकेरी
  • ईशान किशनची विक्रमी भरारी
  • एका वर्षात ५० षटकार
  • सूर्यकुमार यादवचा विक्रम निशाण्यावर

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी खेळला गेला. हा सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ विके्स गमावून २० षटकांत २४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजने १८. ३ षटकांमध्ये ४ विकेट्स गमावून २५२ धावा केल्या. वेस्ट इंडिजने हा सामना ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी केली.(Ishan Kishan hit 50 sixes in calendar year Ind vs Wi)

भारताने हा सामना गमावला असला तरी ईशान किशनने इतिहास रचला आहे. त्याने रांची टी-२० सामन्यात २२ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या.तसेच, ईशान किशनने असा पराक्रम केला आहे, जो आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ दोन भारतीय खेळाडूंनाच करता आला आहे, आणि आता तो या यादीतील तिसरा भारतीय खेळाडू बनला आहे.

एका वर्षात ५० पेक्षा जास्त षटकार ठोकणारा ईशान तिसरा भारतीय

ईशान किशन २०२६ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फलंदाजीच्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सध्याच्या आयसीसी टी२० फलंदाजी क्रमवारीत तो पहिल्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या ४३ धावांच्या खेळीदरम्यान किशनने दोन षटकार मारले, ज्यामुळे तो एका वर्षात ५० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. ईशानच्या आधी, माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने एकदा, तर अभिषेक शर्माने दोनदा हा पराक्रम केला आहे. २०२२ मध्ये एकूण ६८ षटकार मारून, एका वर्षात टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

सूर्यकुमार यादव - ६८ षटकार (२०२२)

अभिषेक शर्मा - ६३ षटकार (२०२६)

अभिषेक शर्मा - ५४ षटकार (२०२५)

ईशान किशन - ५१ षटकार (२०२६)

सूर्यकुमार यादव - ४३ षटकार (२०२३)

ईशान सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडण्यापासून ८० धावा दूर

माजी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नावावर एका वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे, जो आता ईशान किशन मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. सूर्याने २०२२ मध्ये १,१६४ धावा केल्या होत्या, तर किशनने २०२६ मध्येच १,०८५ धावा जमवल्या असून, आता हा विक्रम मोडण्यासाठी त्याला केवळ ८० धावांची गरज आहे.

Best Touring Bikes Under 5 lakhs: भारतातील 5 लाख रुपयांखालील सगळ्यात भारी टुरिंग बाईक्स! आत्ताच पाहा

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम

कानाला क्लिपसारखे दिसणारे Earbuds!

Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत

वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ