वैभव सूर्यवंशी (फोटो- ians) 
Sports

'सिलेक्टर्स, प्लीज आता...'; Vaibhav Suryavanshi बाबत श्रीकांत यांचा निवड समितीला 'हा' इशारा?

Vaibhav Suryavanshi: वैभव युवा आहे, लहान आहे त्याला अजून 'तयार' करत आहोत किंवा अनुभव येण्याची गरज आहे , या गोष्टींच्याखाली संघाच्या बाहेर ठेवणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते असे मत श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.

तेजस भागवत
  • वैभव सूर्यवंशीने ठोकले शानदार द्विशतक

  • क्रिस श्रीकांतचे वैभवबाबत मोठे भाष्य

  • 2027 च्या वर्ल्डकप संघात समावेश करण्याची मागणी

Vaibhav Suryavanshi: सध्या भारतीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या खूप चर्चेत आहे. रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 च्या स्पर्धेत यूएईविरुद्ध वैभव सूर्यवंशीने केवळ 52 बॉलमध्ये द्विशतक ठोकले होते. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने गोलंदाजांची दाणादाण उडवली होती. त्याच्या या झंझावाती आणि ऐतिहासिक खेळीने प्रभावित होऊन माजी भारतीय क्रिकेटर आणि माजी मुख्य निवडकर्ता कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी वैभवचे तोंडभरून कौतुक केले असून, त्याला थेट २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये सामील करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने शानदार आक्रमक द्विशतक ठोकले होते. त्यानंतर श्रीकांत यांनी थेट निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला इशारा दिल्याचे समजते आहे. युवा खेळाडू असलेल्या वैभव सूर्यवंशीला संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर हा 'हिरा' वाया जाऊ शकतो असे मत श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.

सध्या भारतीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. माजी मुख्य निवडकर्ता कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवरून निवड समितीला खडे बोल सुनावले आहेत. वैभव युवा आहे, लहान आहे त्याला अजून 'तयार' करत आहोत किंवा अनुभव येण्याची गरज आहे , या गोष्टींच्याखाली संघाच्या बाहेर ठेवणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते असे मत श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.

मी जे पाहत आहे ते माझ्यासोबतही घडले...रोहित आणि विराटचे भविष्य कोण ठरवत आहे? हरभजन सिंहने काळं सत्य केलं उघड

वैभव सूर्यवंशी केवळ टी 20 नव्हे तर सर्व प्रकारच्या फॉर्मटमध्ये खेळणारा खेळाडू आहे. वर्ल्डकपच्या मुख्य 11 खेळाडूंमध्ये त्याला घ्यायचे नसेल तर ठीक आहे. मात्र त्याला किमान 15 सदस्यीय संघात तरी स्थान दिले पाहिजे. तो सर्व प्रकरच्या फॉर्मटमध्ये खेळण्यास सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हा काय ऐकणार नाही! Vaibhav Suryavanshi ने नावावर केला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड; आता थेट बिहारच्या...

१५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी शानदार खेळ करत आहे. माजी भारतीय कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी वैभवच्या फलंदाजीतील तंत्र आणि आत्मविश्वासाची तुलना थेट क्रिकेटकहा देव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीशी केली आहे. सिलेक्टर्स, प्लीज आता जागे व्हा," असे म्हणत त्यांनी निवड समितीला थेट इशारा दिला आहे.

वैभव सूर्यवंशीने रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये किती चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले?

वैभव सूर्यवंशीने रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये यूएईविरुद्ध खेळताना अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी वैभव सूर्यवंशीबाबत काय मागणी केली आहे?

वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीने प्रभावित होऊन माजी भारतीय क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी त्याला 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देण्याचे आवाहन केले आहे.

मला व्यसनमुक्ती केंद्रात का पाठवले? म्हणत पतीचा संताप; पत्नीवर स्वयंपाकघरातील चाकूने वार

Defence Stocks : डिफेंस शेअर्समध्ये तुफानी तेजी! BEML तब्बल 17% उसळला; BDL आणि HAL मध्येही जोरदार खरेदी, काय आहे कारण?

अकोल्यात मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; उंच इमारतीवर सुरक्षा साधनांविना मजुरांचे काम

Mrudgandha Awards 2026 : ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न; पं. सुरेश तळवलकरांसह दिग्गज कलाकारांचा गौरव

Nagpur News : पॅरामेडिकल शिक्षण घेतले, रोजगाराची हमी कधी ? प्रादेशिक पॅरामेडिकल संस्था अनेक वर्षांपासून रखडली