भारत न्यूझीलंड (फोटो- ians) 27 तारखेपासून भारत-न्यूझीलंड दुसरा सामना
Sports

IND Vs NZ: ' तेथील खेळपट्टी कशी असेल...'; दुसऱ्या टेस्टआधी हेनरीने केले मोठे भाष्य

पहिला सामना वेलिंगटन येथे खेळवण्यात आला. या ठिकाणी फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय संघाने 720 रन्सचा डोंगर उभा केला होता.

तेजस भागवत
  • दुसऱ्या टेस्टच्या पीचबाबत मॅट हेनरीचे भाष्य

  • 27 तारखेपासून भारत-न्यूझीलंड दुसरा सामना

  • पहिला सामना झाला होता ड्रॉ

IND Vs NZ: सध्या भारत अन् न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज सुरू आहे. त्यातील पहिला सामना झाला आहे. हा पहिला सामना ड्रॉ झाला आहे. दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाची सिरीज असणार आहे. दुसरा सामना आता हेगली ओव्हल स्टेडियमवर होणार आहे. त्यावर आता न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेनरीने भाष्य केले आहे.

पहिला सामना वेलिंगटन येथे खेळवण्यात आला. या ठिकाणी फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय संघाने 720 रन्सचा डोंगर उभा केला होता. त्यामुळे दुसरा सामन्यात खेळपट्टी कशी असणार हे आता पहावे लागणार आहे.

IND vs NZ: दुसऱ्या कसोटीत कर्णधार गिलचा मोठा गेमप्लॅन! सिराजचं कमबॅक, प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कट? कशी असेल भारताची संभाव्य Playing 11

भारत अन् न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा निर्णायक सामना २७ नोव्हेंबर पासून ख्राईस्टचर्च येथील हेगली ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. फलंदाजांना पोषक ठरलेल्या वेलिंग्टनच्या सामन्यानंतर आता ख्राईस्टचर्चच्या हेगली ओव्हल येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना किंवा फिरकीपटूंना किती साथ मिळेल, याबाबत चर्चा सुरू आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याने दुसरा सामना होणार आहे त्या खेळपट्टीबाबत भाष्य केले आहे. प्रत्येक सामना वेगळा असतो. ज्या ठिकाणी ज्या पीच वर आपण खेळणार ते पीच प्रत्येक वेळेस वेगळी असते. या मैदानात अलीकडच्या काळात भरपूर रन्स झालेल्या आहेत. त्यामुळे आता तेथील खेळपट्टी कशी असेल याबाबत आताच अंदाज न लावलेला चांगला, असे मॅट हेनरीने म्हटले आहे. गोलंदाजांना बाऊन्स असेल तर ते फायदेशीर ठरू शकते.

पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमात मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.सिराजच्या पुनरागमनामुळे जसप्रीत बुमराहसोबत भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत होईल. दुसऱ्या कसोटीत गुरनूर ब्रारलाही संधी मिळू शकते. 

IND vs NZ: गिल भाई थेट नाचायलाच लागला राव! DRS बरोबर आला अन् Video Viral

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अंशुल कंबोज/आकाश दीप, जसप्रीत बुमराह, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कोण जिंकला?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित (ड्रॉ) राहिला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठे खेळवला जाणार आहे?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना न्यूझीलंडमधील हेगली ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Thane District Sports Complex : ठाणे जिल्ह्यात विविध खेळांसाठी क्रीडा संकुले उभारणार; खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती

Aadhaar Mobile Number Update : आधार केंद्रावर जाण्याचे टेन्शन नाही! फक्त 75 रुपयांत घरबसल्या लिंक करा नवीन मोबाइल नंबर

‘शिक्षणाचे माहेरघर हे गुन्हेगारांचे आवडते घर झाले...’; रोहित पवारांचा घणाघात

Gold Silver Price Crash : नोव्हेंबरमध्ये सोने-चांदी कोसळले! किमती आणखी खाली येणार का?

World News : चीनला प्रगत चिप्सपासून दूर ठेवणे अमेरिकेलाच पडणार महागात? तंत्रज्ञान निर्बंधांवर नव्याने चर्चा