वैभव सूर्यवंशीच्या खेळीनंतर इंटरनेटवर मीम्सचा पाऊस
28 बॉलमध्ये सूर्यवंशीने ठोकले शतक
यूएईविरुद्ध ठोकले खणखणीत दुहेरी शतक
Vaibhav Suryavanshi: सध्या सुरू असलेल्या रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेत इंडिया ए च्या वैभव सूर्यवंशीने धुमाकूळ घातला आहे. काल भारत आणि यूएई या दोन संघांमध्ये महत्वाचा सामना पार पडला. कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने दुहेरी शतक ठोकले आहे. फलंदाज वैभव सूर्यवंशी याने अशीच झंझावाती खेळी करत संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. वैभवने अवघ्या २८ बॉलमध्ये शतक ठोकले आहे.
यूएईविरुद्ध वैभव सूर्यवंशीने अत्यंत आक्रमक आणि खणखणीत दुहेरी शतक ठोकले आहे. बॉल सीमारेषेपार पोहोचवण्याची वैभवने स्वतःशीच स्पर्धा लावली होती की काय असे म्हटले जात आहे. केवळ 28 बॉलमध्ये वैभवने शानदार शतक पूर्ण केले आहे. वैभवच्या या विक्रमी आणि आक्रमक खेळीचे पडसाद मैदानाबाहेरही जोरदार उमटले. शतकानंतर सोशल मिडियावर देखील याचे पडसाद पाहायला मिळाला.
वैभव सूर्यवंशीच्या या शानदार कामगिरीनंतर सोधल मिडियावर मीम्सचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये एक मांजर बंदुकीतून गोळ्या मारताना दिसून येत आहे. यावरून वैभव सूर्यवंशीने कशा प्रकारे गोलंदाजांची धुलाई केली असेल असा अंदाज लावला जात आहे.
वैभव सूर्यवंशीने 28 बॉलमध्ये यूएईमध्ये खणखणीत शतक ठोकले आहे. 250 रटन्सचे टार्गेट वैभव सूर्यवंशीने केवळ 13 ते 14 ओव्हरमध्येच पूर्ण केले. वैभव सूर्यवंशीने पहिल्या ओव्हरपासून आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.
वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्ध आक्रमक खेळी करत दुहेरी शतक ठोकले आहे. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी देखील वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे. बिहारच्या सुपुत्राने देशाची मान उंचावली आहे.
युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या २८ चेंडूंतील झंझावाती शतकानंतर सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर्स आणि क्रिकेट चाहत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच्या खेळण्याच्या आक्रमक शैलीचे कौतुक करताना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या पोस्ट्सच्या माध्यमातून आपला उत्साह व्यक्त केला आहे. वैभवच्या स्फोटक खेळीवर प्रतिक्रिया देताना एका युजरने "दबदबा है, दबदबा था और दबदबा रहेगा" असे स्वरूपात प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे.
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने देखील शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने शानदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.