WWE चे अनुभवी कुस्तीपटू ब्रॉन्सन रीडचे निधन
वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
WWE ने दिली अधिकृत माहिती
Bronson Reid: जागतिक रेसलीनग विषवातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही अत्यंत दु:खाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे WWE चे प्रसिद्ध लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ऑस्ट्रेलियाचे रेसलर जर्मेन हेली म्हणजेच रिंगमध्ये ब्रॉनसन रीड यांचे दु:खद निधन झाले आहे. रिंगमध्ये ब्रॉनसन (Sports) रीड म्हणून त्यांना ओळखले जायचे.
ऑस्ट्रेलियन रेसलर जर्मेन हेली यांना रिंगमध्ये ब्रॉनसन रीड म्हणून ओळखले जाते. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वैद्यकीय अडचणींमुळे त्याचे निधन झाले आहे. शनिवारी म्हणजेच WWE ने अधिकृत निवेदन करत याबाबत माहिती जाहीर केली आहे.
WWE मध्ये एका युगाचा अंत! 'द बीस्ट' ब्रॉक लेसनरची रेसलिंगमधून अधिकृत निवृत्ती
शनिवारी WWE ने एक अधिकृत निवेदन जारी करून या दुर्दैवी घटनेची पुष्टी केली आहे. ब्रॉनसन रीड यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण रेसलिंग विश्वात शोककळा पसरली आहे. कोट्यवधी चाहत्यांनी सोशल मिडियावरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ब्रॉनसन रीड यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची गर्भवती पत्नी पेज आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.
ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथील असलेले जर्मेन हेली यांनी वैयक्तिक रेसलिंग सर्किटमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे त्यांनी न्यू जपान प्रो-रेसलिंग आणि नंतर WWE मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. WWE च्या NXT ब्रँडमध्ये त्यांनी 'NXT नॉर्थ अमेरिकन चॅम्पियनशिप' जिंकून स्वतःला सिद्ध केले होते.
ऑस्ट्रेलियन रेसलर जर्मेन हेली उर्फ ब्रॉनसन रीडच्या वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटने एक भावूक निवेदन जाहीर केले आहे. वयाच्या 38 व्या वर्षी जर्मेन हेली उर्फ ब्रॉनसन रीडचे निधन झाले आहे. हे सांगताना आम्हाला तीव्र दु:ख होत आहे. जर्मेन हे रिंगमध्ये एक मोठे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व होते, मात्र त्याहून अधिक ते एक उत्तम व्यक्ती आणि कुटुंबावर प्रेम करणारी व्यक्ती होती.
John Cena च्या अंतिम सामन्यासाठी WWE दिग्गज आले एकत्र, चाहते आणि सुपरस्टार यांच्या डोळ्यात अश्रू
जर्मेन हेली उर्फ ब्रॉनसन रीड यांच्या निधनानंतर त्यांच्या रेसलिंग कारकीर्दीतील अनेक घटनांना उजाळा दिला जात आहे. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर WWE मध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. २०२२ च्या अखेरीस त्यांनी WWE मध्ये केलेली दमदार पुनरावृत्ती त्यांच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले जाते. प्रतिष्ठित 'आंद्रे द जायंट मेमोरियल बैटल रॉयल' यांसारख्या मोठ्या मनाचे विजेतेपद त्यांनी पटकावले होते.
ब्रॉनसन रीड यांचे खरे नाव काय होते?
ब्रॉनसन रीड यांचे खरे नाव जर्मेन हेली (Jermain Haley) होते. ते ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध व्यावसायिक रेसलर होते.
ब्रॉनसन रीड यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते?
ब्रॉनसन रीड यांना WWE रिंगमध्ये ब्रॉनसन रीड (Bronson Reed) या नावाने ओळखले जात होते.