Tech Tips: विद्यार्थ्यांना आणखी स्मार्ट बनवतील हे 7 AI टूल्स, तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे टॉप सीक्रेट!  
विज्ञान तंत्रज्ञान

Tech Tips: विद्यार्थ्यांना आणखी स्मार्ट बनवतील हे 7 AI टूल्स, तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे टॉप सीक्रेट!

AI चा वापर ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. प्रत्येकजण AI च्या मदतीने त्याची काम सोपी करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या AI टूल्सचा वापर केला जातो. प्रत्येक AI टूलची एक वेगळी खासियत असते.

हर्षदा जाधव
  • विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट पार्टनर आहे AI
  • असाईमेंटसाठी AI चा वापर ठरतो फायदेशीर

जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि AI टूलचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नोकरी करणाऱ्या लोकांपासून विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येकजण AI चा वापर करतं. आता आम्ही तुम्हाला अशा काही 7 एआय टूल्सबद्दल सांगणार आहोत, जे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही टूल आधुनिक विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम टूलकिट असू शकतात. या यादीमध्ये कॉम्पलेक्स कॉन्सेप्ट, समराइज टेंक्स्ट करण्यासाठी टूल समाविष्ट आहेत.

1. Notion AI

जर तुम्ही क्लास नोट्स, असाइनमेंट आणि डेडलाइन्स ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहात, तर तुमच्यासाठी Notion AI अतिशय बेस्ट टूल आहे. प्रोडक्टिविटी टूल तुम्हाला प्रोजेक्ट्स मॅनेज करण्यासाठी, कठिण सब्जेक्ट्स सोपे करण्यासाठी आणि नोट्सची समरी तयार करण्यासाठी मदत करणार आहे. हे टूल तुमच्या अभ्यासात एक पर्सनल असिस्टेंट प्रमाणे मदत करतो. Notion AI च्या मदतीने ग्रुप प्रोजेक्ट्सवर कामं करण अगदी सोप झालं आहे. हे टूल नवीन युजर्ससाठी थोडं कठिण वाटतं.

2. ChatGPT

जर तुमच्याकडे एखादा कठीण प्रश्न आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर चॅटजीपीीटी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. OpenAI चे ChatGPT एक असं चॅटबोट आहे जे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. टेक्स्टबुकची समरी तयार करणं, निबंध लिहीणं, कठिण विषय समजून घेणं आणि कोडिंग करणं या सर्वांसाठी चॅटजीपीटी तुम्हाला मदत करणार आहे. चॅटजीपीटीच्या फ्री वर्जनमध्ये तुम्हाला GPT-3.5 पर्यंत सुविधा मिळते. याशिवाय OpenAI ने आता ChatGPT मध्ये एक नवीन 'स्टडी मोड' जोडला आहे, जो 11भाषांना सपोर्ट करतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

3. Grammarly

तुम्ही टर्म पेपर लिहित असाल किंवा तुमच्या प्राध्यापकांना ईमेल पाठवत असाल, Grammarly तुमच्या मदतीसाठी येथे आहे. हे AI-पावर्ड ग्रामर टूल तुमच्या टायपिंगच्या चुका तपासते आणि तुमच्या लिखाणातील चुका दुरुस्त करते. या टूलचे फ्री वर्जनमध्ये बेसिक ग्रामर आणि क्लॅरिटी अतिशय चांगली आहे.

4. Canva for Education

प्रेजेंटेशन आणि विजुअल्ससंबंधित एखादं काम करण्यासाठी तुम्ही कॅन्व्हाचा वापर करू शकता. Canva for Education एक एआई-बेस्ड डिजाइन प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये शेकडो टेम्पलेट्स आहेत. हे टूल Google Classroom सारख्या टूलसह चांगल्या प्रकारे इंटिग्रेट होते.

5. Mind the Graph

जर तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी Mind the Graph एक उत्तम टूल आहे. हे एक AI-पावर्ड इलस्ट्रेशन प्लेटफॉर्म आहे जे बायोलॉजी, मेडिसिन किंवा केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी रिपोर्ट्स आणि प्रेजेंटेशनचे विजुअल्स तयार करण्यासाठी मदत करते.

6. AskYourPDF

परीक्षेच्या रात्री तुम्ही कधी 300 पानांचे पुस्तक पाहिले आणि विचार केला का - मी हे सर्व वाचू शकत नाही? अशा परिस्थितीत, AskYourPDF तुम्हाला मदत करू शकते. हे AI टूल PDF दस्तऐवज वाचते आणि त्यांचा सारांश स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने देते. यात AI Essay Writer आणि PDF Merger सारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

7. Google का NotebookLM

Google चे NotebookLM हे एका स्मार्ट रिसर्च असिस्टंटसारखे आहे. ते तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कंटेंटसह काम करते. तुम्ही त्यावर डॉक्युमेंट्स, वेबसाइट्स आणि अगदी यूट्यूब व्हिडिओ देखील अपलोड करू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

प्रेजेंटेशन आणि विजुअल्ससाठी कोणेतं AI टूल बेस्ट आहे?

Canva for Education

ChatGPT कोणती कामं करू शकतो?

टेक्स्टबुकची समरी तयार करणं, निबंध लिहीणं, कठिण विषय समजून घेणं आणि कोडिंग करणं

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार