Honor ने एक नवीन सिरीज लाँच केली
तिन्ही स्मार्टफोन्समध्ये रिअर पॅनलवर डिस्प्ले मिळणार
तिन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.57 इंच 1.5K LTPS डिस्प्ले
Honor Smartphones Launched: टेक कंपन्यां सध्या स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये अनेक बदल करत आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या काही स्मार्टफोन मॉडेल्सबद्दल बोलायचं झालं तर, कंपन्या स्मार्टफोनच्या कॅमेरा मॉड्यूलच्या आजूबाजूच्या जागेचा वापर देखील करत आहेत. अशाच डिझाईनमध्ये आता टेक कंपनी Honor ने देखील त्यांची एक नवीन सिरीज लाँच केली आहे. कंपनीने नवीन Honor 700 सीरीज लाँच केली असून या सिरीजअंतर्गत तीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. ज्यामध्ये Honor 700, Honor 700 Pro आणि Honor 700S मॉडेल्सचा समावेश आहे. विशेष म्हणजेच तिन्ही स्मार्टफोन्समध्ये रिअर पॅनलवर डिस्प्ले मिळणार आहे, ज्याला कंपनीने फ्लोटिंग आयलँड असे नाव दिले आहे.
ही स्क्रीन कॅमेरा मॉड्यूलच्या डाव्या बाजूला फीट करण्यात आली आहे आणि याचा वापर नोटिफिकेशन, फ्लाइटचे डिटेल्स, फूड पिकअप कोड आणि म्यूजिक कंट्रोल करण्यासाठी केला जाऊ शकतो. इतकंच नाही तर या स्क्रीनला रिअर कॅमेऱ्याने सेल्फी क्लिक करण्यासाठी देखील व्यूफाइंडरप्रमाणे वापरला जाऊ शकतो. स्क्रीनमध्ये तीन लाइटिंग मोडवाले सॉफ्ट लाइट रिंग देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Honor)
डिस्प्ले
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.57 इंच 1.5K LTPS डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिव्हाईसची पीक ब्राइटनेस 8,000 निट्सपर्यंत जाऊ शकते. तर प्रो मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर, हॉनर 700 मध्ये स्नॅपड्रॅगन 8एस जेन 4 आणि हॉनर 700 एसमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर मिळणार आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी तिन्ही डिव्हाईसमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तर हॉनर 700 आणि 700 प्रो मध्ये 12MP अल्ट्रावाइड लेंस आणि 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस देखील देण्यात आले आहे, जो 3.5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह येतो. डिव्हाईसमध्ये 4K सिनेमॅटिक लाईव्ह फोटो मोड देखील मिळणार आहे.
बॅटरी
याशिवाय, कंपनीने लाँच केलेल्या या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये 9,000mAh किंघाई लेक बॅटरी, 80W वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे. तर प्रो मॉडेलमध्ये 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील मिळणार आहे. तसेच, हॉनर 700 आणि 700 प्रो च्या रियर स्क्रीनवर PPG सेंसर देखील मिळणार आहे, जो हार्ट रेट, ब्लड ऑक्सीजन आणि HRV सारख्या रीडिंग देखील सांगू शकतो.
किंमत
हॉनर 700 एस च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 3,599 युआन म्हणजेच सुमारे 42,000 रुपये आहे. सिरीजच्या हॉनर 700 ची किंमत 3,999 युआन म्हणजेच सुमारे 47,000 रुपये आणि हॉनर 700 प्रो ची किंमत 4,599 युआन म्हणजेच सुमारे 54,000 रुपये आहे. सर्व डिव्हाईसची प्री बुकींग सुरु झाली आहे. तर या डिव्हाईसची पहिली विक्री 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.