Jio Recharge Plan: रिचार्ज एक, फायदे अनेक! 50GB क्लाऊड स्टोरेज, ओटीटी सबस्क्रिप्शन अन् बरंच काही... इतकी आहे किंमत  
विज्ञान तंत्रज्ञान

Jio Recharge Plan: रिचार्ज एक, फायदे अनेक! 50GB क्लाऊड स्टोरेज, ओटीटी सबस्क्रिप्शन अन् बरंच काही... इतकी आहे किंमत

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये एक 399 रुपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 50GB क्लाऊड स्टोरेज, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि इतर अनेक फायदे ऑफर केले जातात. कंपनीच्या या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊया.

हर्षदा जाधव
  • Jio चा स्वस्त रिचार्ज ठरतोय चर्चेचा विषय!

  • Jio च्या रिचार्जमध्ये मिळणार ओटीटी आणि डेटा-कॉलिंगचे फायदे

  • प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार मोबाईल+ हॉलीवूड आणि फॅनकोडचा ॲक्सेस देखील ऑफर केला जाणार

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. यूजर्स त्यांच्या गरजेनुसार प्लॅनची निवड करू शकतात. म्हणजेच जर तुम्हाला केवळ डेटाची आवश्यकता असेल तर डेटा पॅक खरेदी करू शकता. किंवा केवळ कॉलिंग आणि एसएमएसची आवश्यकता असेल तर तुम्ही त्या प्लॅनची निवड करू शकता. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या पोर्टफोलिओमधील अशा एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये कॉलिंग, डेटा, क्लाऊड स्टोरेज, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि इतर फायदे ऑफर केले जातात.

रिचार्ज प्लॅनची किंमत

कंपनी त्यांच्या करोडो यूजर्सना 399 रुपयांचा एक प्लॅन ऑफर करते. हा प्लॅन अशा लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे, ज्यांना अनलिमिटेड डेटासह एंटरटेनमेंट आणि इतर फायदे देखील पाहिजे आहेत. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)

रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

कंपनीच्या पोर्टफोलिओमधील 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. प्लॅनमध्ये मिळणारे अनलिमिटेड 5G डेटाचे फायदे केवळ पात्र यूजर्ससाठी उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त कंपनीच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाणार आहे. तसेच यूजर्सना या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे.

ओटीटी आणि डिजिटल सर्विस

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगसह विविध डिजिटल सर्विस आणि एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार मोबाईल+ हॉलीवूड आणि फॅनकोडचा ॲक्सेस देखील ऑफर केला जाणार आहे. जिओटिव्हीद्वारे फॅनकोडवर प्रवेश केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना जिओगेम्स मोबाईल, जिओटिव्ही, जस्टडायल लाइट, हाइपरलोकल कूपन आणि डिजिटल डायरीसारख्या सर्विसचा फायदा देखील मिळणार आहे.

50GB क्लाउड स्टोरेज आणि कॅन्व्हा प्रो

जिओ प्लॅनमध्ये जिओ एआय क्लाऊडवर 50GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. यासोबतच प्लॅनमध्ये ग्राहकांना 12 महिन्यांसाठी कॅन्व्हा प्रोचे मोफत सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे, ज्याची किंमत सुमारे 4,000 रुपये आहे.

Shubhankar Ekbote: ‘ईठा’मध्ये मराठी कलाकारांचा जलवा! सिद्धार्थ जाधवसोबत आणखी एक अभिनेता श्रद्धा कपूरसोबत शेअर करणार स्क्रीन

छोटी MINI,मोठी झेप! BMW ग्रुपच्या विक्रीत मोठा वाटा मिळवण्याची तयारी

Lab grown diamond: लॅब ग्रोन डायमंडला तरुणाईची पसंती, कमी किमतीत मिळतोय हिऱ्यांमध्ये आकर्षक पर्याय!

Kaal Bhairav Jayanti 2026: कधी आहे कालभैरव जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व

Bigg Boss 20 Eviction: ‘बिग बॉस २०’मध्ये १२व्या आठवड्यात मोठा धक्का! माही विज नव्हे, ‘हा’ स्पर्धक घराबाहेर