अॅपलने व्यापार गुपितांच्या कथित चोरीवरून OpenAI आणि दोन माजी कर्मचाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे.
OpenAI ने अॅपलवर अन्यायकारक व्यावसायिक पद्धतींचा आरोप करत प्रतिदावा दाखल केला आहे.
AI उपकरणे, Siri मधील सुधारणा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वाढती स्पर्धा यामुळे दोन्ही कंपन्यांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
अॅपल कंपनी येत्या काळात त्यांच्या उपकारांमध्ये स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा समावेश करणार होते. ,मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे अॅपल आणि OpenAI या दोन दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांमधील वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. अॅपलने व्यापार गुपिते चोरल्याचा आरोप केल्यानंतर OpenAI ने अॅपलविरोधात प्रतिदावा दाखल केला आहे. पण अॅपल बेकायदेशीर आणि अन्यायकारक व्यावसायिक पद्धतींचा अवलंब करत असल्याचा आरोप OpenAI ने केला आहे. शुक्रवारी उत्तर कॅलिफोर्नियातील फेडरल न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला.
या वादाची सुरुवात जुलै महिन्यात झाली होती. अॅपलने OpenAI आणि अॅपलमधून OpenAI मध्ये गेलेल्या दोन माजी कर्मचाऱ्यांविरोधात खटला दाखल केला होता. या कर्मचाऱ्यांनी अॅपलची गोपनीय व्यावसायिक माहिती आणि तांत्रिक गुपिते चोरून AI उपकरणे विकसित करण्यासाठी वापरल्याचा आरोप कंपनीने केला होता. विशेषतः अद्याप बाजारात सादर न झालेल्या उत्पादनांशी संबंधित माहितीचा गैरवापर झाल्याचा दावा अॅपलने केला होता.
दुसरीकडे, अॅपलने OpenAI चे आरोप फेटाळले आहेत. OpenAI च्या कर्मचाऱ्यांनी अॅपलची गोपनीय माहिती जाणूनबुजून मिळवून तिचा वापर केल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आणि वैयक्तिक माहिती वेगळी ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, असेही अॅपलने स्पष्ट केले.त्यांच्या दाव्यात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दोन्ही कंपन्यांमधील संघर्षामागे AI उपकरणांच्या बाजारपेठेतील स्पर्धाही महत्त्वाची आहे. OpenAI अॅपलचे माजी डिझाइन प्रमुख यांच्या सहकार्याने AI आधारित वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित करत आहे. तर अॅपल Siri मध्ये सुधारणा करून AI क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. Amazon, Meta आणि Google यांसारख्या कंपन्याही या स्पर्धेत आहेत.त्यामुळे येत्या काळात या विवादामुळे तंत्रज्ञानाच्या विश्वात कोणते बदल होती हे पाहणे महत्वाचे आहे.
या प्रकरणात दोन्ही कंपन्यांनी ज्युरी ट्रायलची मागणी केली आहे. त्यामुळे आगामी न्यायालयीन सुनावणीकडे तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष लागले आहे.