X वर लाँच झालं नवीन फीचर (फोटो सौजन्य- pinterest) 
विज्ञान तंत्रज्ञान

X अकाऊंटवर लॉगिन करण्यासाठी पासवर्डची गरज नाही, लाँच झालं 'हे' नवीन फीचर

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X ने युजर्ससाठी Pass-Key फीचर लाँच केलं आहे. Pass-Key फीचरच्या मदतीने युजर्स पासवर्डशिवाय X अकाऊंटवर लॉग इन करू शकणार आहेत. Pass-Key फीचरमुळे युजर्सचे फिशिंगपासून संरक्षण होते. पारंपारिक पासवर्डपेक्षा Pass-Key अत्यंत सुरक्षित मानलं जात आहे.

हर्षदा जाधव

सोशल मिडीयावर लोकं मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तिला भेटून तिच्यासोबत संवाद साधण्यापेक्षा सोशल मिडीयावर त्या व्यक्तिसोबत बोलणं लोकांना अधिक सोयीस्कर वाटतं. सोशल मिडीयाची लोकप्रियता दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. तसेच नवनवीन सोशल मिडीया ॲप्स देखील लाँच केले जात आहेत. एकाच व्यक्तिचे अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट असू शकतात. अनेक वेळा लोक त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड विसरतात. किंवा काही वेळा पासवर्ड हॅक होतात ज्यामुळे लोकांना खूप त्रास होतो.

लोकांची पासवर्ड समस्या लक्षात घेत आता अनेक कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहेत. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X ने आपल्या Android युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. Pass-Key असं या नवीन फीचरचं नाव आहे. या फीचरच्या मदतीने आता पासवर्ड विसरण्याची भीती संपणार आहे. Pass-Key फीचरच्या मदतीने तुम्ही पासवर्डशिवाय X अकाऊंटवर लॉग इन करू शकणार आहात.

Pass-Key एक डिजिटल सुरक्षा तंत्रज्ञान आहे, जी पासवर्डच्या जागी काम करते. या अंतर्गत, कोणत्याही वेबसाइट किंवा ॲपवर लॉग इन करण्यासाठी युजर्सना पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. Pass-Key एक विशेष क्रिप्टोग्राफिक Key वापरते जी त्या युजर्ससाठी अद्वितीय असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, या फीचरच्या मदतीने तुम्ही पासवर्डशिवाय तुमच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर लॉग इन करू शकता. Pass-Key फीचर तुमचा बायोमेट्रिक डेटा वापरते जसे की तुमचे फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन. हे फीचर Android यूजर्ससाठी X वर लाँच करण्यात आलं आहे.

Pass-Key फीचर ॲक्टिवेट करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा

  • सर्वात आधी तुम्हाला तुमचे X अकाऊंट उघडावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला 'नेव्हिगेशन बार' वर जाऊन तुमच्या अकाऊंटवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, 'सेटिंग्ज आणि गोपनीयता' वर जा आणि 'सुरक्षा' पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर, शेवटी 'अतिरिक्त पासवर्ड संरक्षण' वर टॅप करा आणि Pass-Key पर्याय निवडा.
  • Pass-Key निवडल्यानंतर, 'ॲड Pass-Key' पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा पासवर्ड जोडला जाईल त्यानंतर तुम्ही पासवर्ड न टाकता तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता.

पारंपारिक पासवर्डपेक्षा Pass-Key अत्यंत सुरक्षित मानलं जात आहे. सुरक्षित आणि अद्वितीय की द्वारे Pass-Key युजर्सची ओळख सत्यापित करते. पारंपारिक पासवर्डपेक्षा पासकी अधिक सुरक्षित आहे. हे सुरक्षित आणि अद्वितीय की द्वारे वापरकर्त्यांची ओळख सत्यापित करते. या प्रक्रियेत, सर्व्हर आणि युजर्सच्या डिव्हाइसमध्ये फक्त एक सुरक्षित चॅनेल तयार केला जातो, ज्यामुळे हॅकिंगचा धोका कमी होतो.

Pass-Key फीचरमुळे युजर्सचे फिशिंगपासून संरक्षण होते. फिशिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये युजर्सची संवेदनशील माहिती फसवणूक करून चोरली जाते. Pass-Key फिशिंगपासून संरक्षण प्रदान करते कारण युजर्सला लिंकवर क्लिक करण्याची किंवा चुकीच्या वेबसाइटवर त्यांचे क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करण्याची आवश्यकता नसते.

वाळूमाफियांची दादागिरी! शासकीय कार्यालयात घुसून तलाठ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला...

Defense News : डोकलामच्या पूर्वेला चीनचा नवा डाव! तोर्शा खोऱ्यात जमीन साफ केल्याचे उपग्रह फोटोंमधून उघड; भारताची चिंता वाढली

Neha Gadre Return to India: ऑस्ट्रेलियाला रामराम ठोकला! दोन आठवड्यांत सगळं विकलं अन् मायदेशी परतली मराठी अभिनेत्री

थंडीत गिझरचे पाणी लवकर थंड होते? ही छोटी चूक पडू शकते महागात!

पुण्यात गावठी दारूचा धंदा उघड! दोन महिलांसह तिघांना अटक; 37 लिटर दारू जप्त