(फोटो सौजन्य:Pinterest)  
पर्यटन

Char Dham Yatra: चार धाम यात्रेसाठी लाइव्ह टूर पॅकेज सुरू, किंमत काय असेल? कोणकोणत्या सुविधा मिळतील ते जाणून घ्या

चारधाम यात्रेसाठी तिकीट बुकिंग आता सुरु करण्यात आली आहे. चारधामला जाताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आयआरसीटीसीने खास टूर पॅकेज आणले आहे. यात प्रवाशांना कमी किमतीत अनेक सोयी-सुविधा पुरवल्या जातील.

नुपूर भगत

चारधाम यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थयात्रा मानली जाते. या यात्रेत उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांचा (यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) समावेश होतो. ही यात्रा मुख्यतः मे महिन्यापासून सुरु होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेत सामील होण्यासाठी उत्तराखंडात येत असतात. चारधाम यात्रेच्या तिकिटासाठी भाविकांना फार त्रास सहन करावा लागतो. याचे तिकीट मिळवणे काही सोपी गोष्ट नाही.

अनेक वेळा प्रचंड गर्दीमुळे काही काळ बुकिंग बंद होते. यामुळेच लोक चारधामला जाण्यासाठी आधीच तिकीट बुक करतात. यासाठी फक्त तिकीट बुक करणे पुरेसे नाही तर चारधामच्या प्रवासादरम्यान हॉटेल, तंबू सुविधांचीही आधीच पूर्वतयारी करावी लागते. त्यामुळेच चारधामला जाताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) ने टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांच्या प्रवासाची संपूर्ण जबाबदारी भारतीय रेल्वे घेते.

दिल्लीहून चारधाम यात्रा टूर पॅकेज

सर्वप्रथम, हे टूर पॅकेज बुक करण्यापूर्वी, तुम्हाला महत्त्वाच्या तारखांची माहिती घ्यायला लागेल. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर असे सांगण्यात आले आहे की, हे पॅकेज प्रत्येक दिवसासाठी नाही. या टूर पॅकेजसाठी काही तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत, त्यामुळे तुम्ही या तारखांना तिकीट बुक करू शकता. तुम्ही 01, 15 मे, त्यानंतर 1, 12 आणि 24 जून, 1, 12 आणि 24 सप्टेंबर आणि त्यानंतर 1 आणि 15 ऑक्टोबर या तारखांची तुमचे तिकीट बुक करू शकता. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना बद्रीनाथ/गंगोत्री/केदारनाथ/यमुनोत्री येथे नेले जाईल. हे पॅकेज 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी आहे. या पॅकेजमध्ये प्रवाशांना बसने प्रवास करावा लागेल.

किती असेल टूर पॅकेजची किंमत?

  • तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला या टूर पॅकेजची 78,000 रुपये मोजावे लागतील
  • तर तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास केल्यास तुम्हाला 54,000 रुपये मोजावे लागतील
  • तीन लोकांसोबत प्रवास केल्यास तुम्हाला 49,000 रुपये आकारले जातील
  • मुलांसोबत सहलीला जाण्यासाठी तुम्हाला 30,000 रुपये मोजावे लागतील
  • IRCTC च्या अधिकृत वेब साइटवर या पकेजविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे , इथे तुम्ही पॅकेजमध्ये असलेल्या सुविधांविषयीही सविस्तर जाणून घेऊ शकता

टूर पॅकेजमध्ये या सुविधा दिल्या जातील

  • या कालावधीत प्रवाशांना हॉटेलमध्ये 11 रात्री 12 दिवस राहण्याची सुविधा मिळणार आहे
  • प्रवासादरम्यान, तुम्हाला आरामदायी एसी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करण्याची सुविधा मिळेल
  • या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा पुरवली जाईल. मात्र दुपारच्या जेवणासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील
  • तुम्हाला दररोज 1 लिटर पाण्याची बाटली दिली जाईल
  • IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता

ADV बाईकमध्ये 21-Inch Front Wheel का असते? मोठ्या चाकामागचे खास कारण!

Honda XR300 Rally की Himalayan 440? कोणती ADV बाइक आहे जास्त दमदार?

बाईकच्या इंजिनमध्ये असते Oil Cooler; इंजिन थंड ठेवण्यासाठी कसे करते काम?

Pune Firing News : पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का? सुप्रिया सुळेंचा सवाल, पुण्याचं पालकत्व घेण्याची फडणवीसांना केली विनंती

राहुल गांधींचं नाव घेताच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पोस्ट ब्लॉक? काँग्रेसचा मेटावर गंभीर आरोप, मेटाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका