व्हिडिओ गॅलरी

अहिल्यानगरमध्ये मोठी दुर्घटना! पोलीस अधीक्षक कार्यालय चौकामध्ये होर्डिंग कोसळले

नगरमधील पोलीस अधीक्षक कार्यालय चौकामध्ये वादळी वाऱ्यामुळे फ्लेक्स थेट मुख्य वीज तारांवर अडकला असून, मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत तातडीने कारवा

हर्षदा डोंगरे

अहिल्यानगर शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय चौकामध्ये फ्लेक्स पडून मुख्य वीज वाहक तारांवर अडकला. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून याकडे महावितरण, महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनाचे देखील दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय चौकातून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. घाटकोपर दुर्घटनेची आठवण करून देणारी ही घटना असून, प्रशासन आणि महावितरण यांचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका