ट्रम्प स्वतःला देव समजतो, पुन्हा केले असे वादग्रस्त विधान, म्हटले - 'माझ्या मनात येईल ते मी करेन...' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)  
World

Trump Statement : मीच माझा कायदा! ट्रम्पने दाखवली आंतरराष्ट्रीय नियमांना केराची टोपली; मुलाखतीने जगभरात उठवले चर्चेचे वादळ

Donald Trump : ट्रम्प यांनी वादग्रस्त पावले उचलली आहेत, जसे की व्हेनेझुएलावरील कारवाई, ग्रीनलँडला जोडण्याचा पर्याय आणि इराणचा इशारा, त्यांची शक्ती केवळ त्यांच्या नैतिकता आणि निर्णयक्षमतेमुळे मर्यादित आहे असे म्हटले आहे.

हर्षदा पाटोळे
  • 'माझी नैतिकता हेच सर्वोच्च'

  • आंतरराष्ट्रीय कायद्यांना केराची टोपली

  • ग्रीनलँड आणि तैवानवर भाष्य

Trump New York Times interview 2026 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानांनी संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ट्रम्प यांनी आपली सत्ता आणि आंतरराष्ट्रीय नियम यावर भाष्य करताना स्वतःला जणू 'सर्वोच्च' मानल्याचे दिसून येत आहे. "मला कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा नाही, मला थांबवू शकणारी एकमेव गोष्ट म्हणजे माझी स्वतःची नैतिकता आणि माझे मन," असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात नवा वाद पेटला आहे.

आंतरराष्ट्रीय कायदे म्हणजे केवळ 'व्याख्या'?

जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे बंधनकारक आहे का? त्यावर त्यांनी अत्यंत सूचक उत्तर दिले. ते म्हणाले, "हे तुमच्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या व्याख्येवर अवलंबून आहे. मी लोकांना त्रास देऊ इच्छित नाही, पण अमेरिकेच्या हितासाठी मला जे योग्य वाटेल तेच मी करेन." याच विचारसरणीतून त्यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेला ६६ आंतरराष्ट्रीय संघटना आणि करारांमधून बाहेर काढण्याचा ऐतिहासिक आणि वादग्रस्त निर्णय घेतला आहे.

"मालकी हक्क ही यशाची गुरुकिल्ली": ग्रीनलँडचा हट्ट

ट्रम्प यांनी ग्रीनलँड या डेन्मार्कच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रदेशावर पुन्हा एकदा हक्क सांगितला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भाडेतत्त्वावर किंवा केवळ करार करून यश मिळत नाही, तर 'मालकी' असणे मानसिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. "मालकी तुम्हाला अशी ताकद देते जी केवळ कागदावर स्वाक्षरी करून मिळत नाही," असे म्हणत त्यांनी ग्रीनलँड अमेरिकेचा भाग बनवण्यावर भर दिला. या विधानामुळे डेन्मार्क आणि युरोपीय देशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

credit : social media and Twitter

तैवान आणि चीनबाबतचा 'ट्रम्प कार्ड'

तैवानच्या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिलेल्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला. "मी राष्ट्राध्यक्ष असताना शी जिनपिंग तैवानवर ताबा मिळवण्याचे धाडस करणार नाहीत. मी त्यांना स्पष्ट सांगितले आहे की, असे झाल्यास मला ते अजिबात आवडणार नाही. कदाचित माझ्या नंतर येणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या काळात चीन असे करू शकेल, पण माझ्या कार्यकाळात हे शक्य नाही," असे ट्रम्प यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

व्हेनेझुएला कारवाईचे समर्थन

नुकत्याच झालेल्या व्हेनेझुएलातील लष्करी कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की, मादुरो यांना सत्तेवरून हटवणे अमेरिकेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होते. त्यांनी दावा केला की, मादुरो ड्रग्ज कार्टेलच्या माध्यमातून अमेरिकेला धोका निर्माण करत होते. चीन आणि रशिया यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत, कारण ही अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित बाब आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला.

💡Frequently Asked Questions

Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याबाबत काय म्हटले?
Ans: ट्रम्प म्हणाले की, त्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा नाही. त्यांना केवळ त्यांची स्वतःची नैतिकता आणि विचार रोखू शकतात.

Que: अमेरिकेने किती आंतरराष्ट्रीय संघटना सोडल्या आहेत?
Ans: ट्रम्प यांनी अमेरिकेला तब्बल ६६ आंतरराष्ट्रीय संघटना आणि उप-संघटनांमधून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.

Que: ग्रीनलँडबाबत ट्रम्प यांची भूमिका काय आहे?
Ans: ट्रम्प यांच्या मते, ग्रीनलँडवर अमेरिकेची 'मालकी' असणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि यशासाठी आवश्यक आहे, केवळ करार पुरेसे नाहीत.

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

LinkedIn Study Entrepreneurship : स्टार्टअप आणि बिझनेसचा क्रेझ! 85% व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय; लिंक्डइनचा सर्वे काय सांगतो?

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी