नवी दिल्ली : ट्विटर (Twitter), टेस्ला (Tesla), स्पेस एक्स (Space X) यासारख्या मात्तबर कंपनीचे मालक (Company Owner) असलेल्या एलन मस्क (Elon Mask) यांच्यासाठी २०२२ हे साल फार काही लाभदायक ठरलेले दिसत नाही. तसचं २०२३ ची सुरुवातही मस्क यांच्यासाठी आशादायक झालेली नाही.
४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर हे सोशल मीडियाचे (Social Media) प्रसिद्ध हँडल (Popular Handle) खरेदी करुन मस्क यांना नुकसानच सहन करावं लागलंय. कधी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असा परिचर असलेल्या एलन मस्क यांना संपत्ती गमावण्यात ही नंबर एकच पद मिळालंय. आता त्यांच्या या रेकॉर्डची नोंद गिनीज बुकातही होण्याची शक्यता आहे.
एलन मस्क हे जगातील पहिले असे व्यक्ती ठरले आहेत की ज्याने १६ अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड जपानमधील टेक गुंतवणूकदार मासायोशी सन यांच्या नावावर होता. एलन मस्क यांनी त्यांना मागे टाकत सर्वाधिक जास्त संपत्ती गमावण्याच्या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला होता.
ट्विटरच्या ऑफिसमधील सामान विक्रीला
जगातील सर्वाधिक संपत्ती गमावणारी व्यक्ती असा नावलौकिक आता एलन मस्क यांच्या नावामागे जमा झालाय. अडचणी इथंच संपलेल्या नाहीत. ट्विटर खरेदी केल्यानंतर आता एलसन मस्क आणखी एका वादात अडकले आहेत. ट्विटरचं ऑफिस आणि प्रायव्हेट प्लेनचं भाडं भरलं नसल्यानंही त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय. आता तर ट्विटर ऑफिसमधील सामान विकण्यापर्यंत वेळ येऊन ठेपली आहे.
एलन मस्क चांगल्याच आर्थिक अडचणीत
ट्विटरमध्ये कर्मचाऱ्यांची कपात, सेवा आणि सुविधांमध्ये कपात यापाठोपाठ आता एलन मस्क हे ट्विटरच्या ऑफिसमधलं सामान विकण्यापर्यंत येवून पोहचले आहेत. मस्क यांनी ट्विटरच्या ऑफिसमधील ६३१ सामानांचा लिलाव सुरु केला आहे. एक्स्ट्रा कमाी करण्यासाठी मस्क यांनी हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येतंय. तुम्हीही या लिलावात ऑनलाीन बोली लाून हे सामान विकत घेऊ शकणार आहात.
इथं होतेय ट्विटरच्या ऑफिसमधील सामानाची विक्री
हेरिटेज ग्लोबल पार्टनरच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ट्विटरच्या सामानासाठी ऑनलाईन बोली लावू शकाल. ट्विटरच्या सन फ्रान्सिस्को कार्यालयातील अधिकतर सामान या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. आज रात्री साडे अकरा वाजेपर्यंत ही ऑनलाईन बोली लावता येणार आहे. ट्विटर कंपनीच्या ऑफिसचं फर्निचर, किचन अप्लायन्सेस, मशिन्स, लाईट्स विकण्यात येत आहेत. हे सामान विकून मस्क अधिक निधी उभारण्याच्या प्रयत्नात आहेत.
काय काय विकण्यात येतंय
ट्विटरच्या सेलमध्ये १६ लाख रुपये खर्च करुन तुम्ही ट्विटरचा बर्ड लोगो खरेदी करु शकाल. ७ लाख खर्च करुन प्लांटर खरेदी करता येईल. ८१ हजार रुपयांत ट्विटरच्या ऑफिसमधली खुर्ची घरी आणता येणार आहे. एन ९५ हे मास्क २८ हजारांना विकण्यात येतायेत. यासह टीव्ही, मायक्रोव्हेह, फ्रीज, पिझ्झा टेबस, टेबल तुम्ही खरेदी करु शकणार आहात.
ट्विटरनं केलं कंगाल
ऑक्टोबर २०२२ पासून मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून ते खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पहिल्यांदा त्यांनी ३ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यानंतंर वर्क कल्चरमध्ये बदल आणलाय. ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांत कपात करण्यात आलीय. अनेक ऑफिसेसचे भाडेही भरण्यात आलेले नाही. या ऑफिसेसचे मालक आता नोटीस पाठवीत आहेत. ट्विटरचे ऑफिस रिकामे करा, असे सांगण्यात येतेय.