Isreal-Hamas Ceasefire: ५०० वेळा युद्धबंदीचे उल्लंघन अन् २७ हल्ले; गाझात शेकडो पॅलेस्टिनींचा मृत्यूने गोंधळ, परिस्थिती अजूनही बिकट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया) 
World

Isreal-Hamas Ceasefire: ५०० वेळा युद्धबंदीचे उल्लंघन अन् २७ हल्ले; गाझात शेकडो पॅलेस्टिनींचा मृत्यूने गोंधळ, परिस्थिती अजूनही बिकट

Israel Hamas Ceasefire : इस्रायल आणि हमास युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही गटात युद्धबंदी होऊनही इस्रायलचे गाझावर हल्ले सुरुच आहे. यामुळे गाझात पॅलेस्टिनींची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

स्वराली शहा
  • इस्रायलकडे गाझात युद्धबंदीचे उल्लंघन
  • 24 तासांत 27 हल्ले
  • शेकडो पॅलेस्टिनींचा मृत्यू

Israel Hamas War News in Marathi : तेल अवीव : इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा एकदा संघर्ष (Israel Hamas War) सुरु झाला आहे. दोघांमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी लागू करण्यात आली होती. याअंतर्गत युद्धबंतील कैद्यांच्या सुटकेचा पहिला टप्पाही पूर्ण झाला. परंतु आता इस्रायलने पुन्हा गाझावर हल्ले सुरु केले आहेत. गेल्या 24 तासांत किमान 27 हल्ले गाझावर करण्यात आले असून शेकडो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

हमासने इस्रायली हल्ल्यांचा केला निषेध

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या 44 दिवसांत इस्रायलने 500 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. सध्या गाझामध्ये परिस्थिती बिकट आहे. पॅलेस्टिनींचा हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे.हमासने इस्रायलवर युद्धबंदीच्या उल्लंघनाचा आरोप केला आहे. हमासने या संबंधी एक निवेदना जारी केला आहे.

या निवेदनात सांगण्यात आले आहे की, इस्रायली अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केले जात आहे. सतत गंभीर हल्ले केले जात आहे. या हल्लांचा आणि युद्धबंदीच्या उल्लंघनाचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे हमासने म्हटले आहे. हमासने इस्रायलच्या युद्धबंदीच्या उल्लंघनाला, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचे उल्लंघन म्हणून संबोधले आहे.

शनिवारी इस्रायलचा तीव्र हल्ला...

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (22 नोव्हेंबर) रोजी इस्रायलने हमासवर तीव्र हल्ला केला होता. या हल्ल्यात 24 लोकांचा मृत्यू आणि 87 जण जखमी झाले आहेत. यासाठी पूर्णपण इस्रायलला जबाबदार धरण्यात आले आहे. इस्रायल सातत्याने हल्ले करत असल्याचा आणि यामध्ये वैद्यकीय क्षेत्र आणि साहित्यांना लक्ष्य केले जात असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

इस्रायलची प्रतिक्रिया

दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्यांच्या सैन्याने हमासच्या सैन्याने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, शनिवारी(22 नोव्हेंबर) हमासच्या एका सदस्याने त्यांच्या सैन्यावर अचानक हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केले आहे. तसेच इस्रायलने या कारवाईत पाच वरिष्ठ हमास अधिकारी ठार झाल्याचेही म्हटले आहे.

पण हमासने हा दावा फेटाळला आहे. याच वेळी हमासने अमेरिकन सरकारला इस्रायलवर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. हमासने म्हटले आहे की, इस्रायलन युद्धबंदीचे उल्लंघन करत असून गाझात हिंसाचार घडवून आणत आहे. इस्रायलकडून रोज आणि पद्धतशीरपणे युद्धबंदीचे उल्लंघन केले जात असल्याचे हमासचे म्हणमे आहे. सध्या गाझातील परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

फक्त 6 रुपयांत बेड गरम? Heated Blanket चा वीज वापर जाणून घ्या!

नाशिकमध्ये दुष्कळाची तीव्रता वाढली; २०१ गाव-वाड्यांना ६० टँकरने पाणीपुरवठा

Laxman Hake: 'पवार कुटुंबाचं राजकारण संपेल!' सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

रुग्णालयातही मौल्यवान दागिने सुरक्षित नाहीत? कल्याणच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला

Nagpur News : सीताबर्डी उड्डाणपूल बंद होताच नागपूरची वाहतूक कोलमडली; पर्यायी मार्गांअभावी नागरिक तासनतास कोंडीत