Thanks givings in US फोटो सौजन्य AI
World

World News : न्यूयॉर्कच्या 'मेसीज थँक्सगिव्हिंग डे परेड'ला हवामानाचा फटका; १०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच परेड पुढे ढकलली

न्यूयॉर्कमधील मेसीज थँक्सगिव्हिंग डे परेड खराब हवामानामुळे पहिल्यांदाच पुढे ढकलण्यात आली आहे. २६ नोव्हेंबरऐवजी आता २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता परेड सुरू होणार असून यंदा तिचे १०० वे आयोजन आहे.

Chaitanya Pisal
  • खराब हवामानामुळे ऐतिहासिक निर्णय

  • शनिवारी सकाळी ८.३० वाजता परेडला सुरवात

  • १०० वर्षांची परंपरा; पहिल्यांदाच तारखेत बदल

World News : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या मेसीज थॅंक्सगिव्हिंग डे परेडला यंदा खराब हवामानाचा फटका बसला आहे . हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे या परेडच्या जवळपास १०० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच तिचे आयोजन पुढे ढकलावे लागल्याची माहिती समोर आली आहे .

या परेडमध्ये सहभागी होणारे विशाल फुगे , आकर्षक सजवलेले फ्लोट्स आणि संगीत पथके हे मुख्य आकर्षण असते . त्यामुळे परेडच्या वेळापत्रकातील बदलामुळे प्रेक्षकांमुळे उत्सुकतेसोबतच नाराजीही दिसून येत आहे .

खराब हवामानामुळे ऐतिहासिक निर्णय

मेसीज थॅंक्सगिव्हिंग डे परेड ही अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय वार्षिक परेडपैकी एक मानली जाते . १९२४ मध्ये सुरु झालेल्या या परेडचे यंदा १०० वे आयोजन आहे . मात्र न्यूयॉर्कमध्ये येणाऱ्या शक्तिशाली वादळामुळे आयोजकांनी गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी होणारी परेड पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला .

मुसळधार पाऊस , वेगवान वारे आणि संभाव्य पूरपरिस्थिमुळे हा निर्णय घेण्यात आला . सहभागी कलाकार , स्वयंसेवक आणि प्रेक्षकांची सुरक्षितता लक्षात घेऊन न्यूयॉर्क प्रशासन आणि आयोजकांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला .

शनिवारी सकाळी ८.३० वाजता परेडला सुरवात

आता ही एतेहासिक परेड शनिवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता ( न्यूयॉर्क स्थानिक वेळेनुसार ) सुरु होणार आहे .यामध्ये तब्बल १०० विशाल फुगे, आकर्षक फ्लोट्स , संगीत पथके आणि विविध कलाकार सहभागी होणार आहेत .

स्पायडरमॅन , बझ लाइटइयर यांसारख्या लोकप्रिय पात्रांचे विशाल फुगे प्रेक्षकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत . आयोजकांनी परेडमधील बहुतांश कार्यक्रम आणि कलाकारांचे नियोजन कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे .

१०० वर्षांची परंपरा; पहिल्यांदाच तारखेत बदल

या परेडच्या इतिहासात यापूर्वीही खराब हवामानाचा परिणाम झाला होता . १९७१ मध्ये जोरदार वाऱ्यामुळे विशाल फुगे उडवण्यात आले न्हवते . मात्र परेड सुरु ठेवण्यात आली होती . दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९४२ ते १९४४ या तीन वर्षात परेड रद्द करण्यात आली होती . परंतु हवामानामुळे संपूर्ण परेड दुसऱ्या दिवशी हलवण्याची ही पहिलीच वेळ आहे . त्यामुळे यंदाचे १०० वे आयोजन ऐतिहासिक ठरले आहे .

Devendra Fadnavis: अमली पदार्थांच्या नेटवर्कवर सरकारचा मोठा प्रहार! जिल्हास्तरीय कामगिरीचे नियमित मूल्यमापन होणार

Indian Armed Forces: देशसेवेसाठी मुलींची 'गरुडझेप'; NDA मध्ये 'या' दोन मुलींनी घेतली उत्तुंग भरारी

मोठा अपडेट! X च्या Android ॲपमध्ये पोस्ट शेड्यूलिंग फीचर सुरू; फोटो आणि व्हिडिओही होणार शेड्यूल

viral Instagram interview : तंबूच घर, सायकलच साथीदार! आयरिश तरुण भारतातील १०० गावांना देणार भेट

Rahul Gandhi Live : 'मत चोरीसाठी नवा प्लॅन...', राहुल गांधींचा डिलिमिटेशनवरून केंद्र सरकारवर निशाणा