OPEC Iraq and Venezuela exit ?  फोटो सौजन्य AI
World

World News : POEC संघटनेला अमेरिकेचा मोठा धक्का; व्हेनेझुएला आणि इराकला बाहेर पडण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा दबाव

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएला आणि इराकला OPEC मधून बाहेर पडण्याचा विचार करण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा समोर आला आहे. तेल उत्पादन वाढवणे आणि अमेरिकन कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे OPEC संघटनेच्या भवितव्याबाबत चिंता वाढली आहे.

Chaitanya Pisal
  • ट्रम्प प्रशासनाची तेल बाजारावरील नजर

  • व्हेनेझुएलावर आर्थिक दबाव

  • इराकमध्येही चर्चेला वेग

World News : जागतिक तेल बाजारपेठेत नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठी राजकीय खेळी केल्याचा दावा समोर आला आहे . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हेनेझुएला आणि इराक या दोन प्रमुख तेल उत्पादक देशांवर OPEC संघटनेतून बाहेर पडण्याचा विचार करण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे .

हे सगळे जुळवून आणण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांशी चर्चा केली होती . या दोन्ही देशांना संघटनेतून बाहेर काढण्यात यश आल्यास जागतिक तेल बाजारपेठेतील OPEC चे वर्चस्व कमी होईल .मात्र अमेरिकेने उच्चस्तरीय चर्चेत OPEC मधून बाहेर पडण्याचा मुद्दा उपस्थित केल्याचे नाकारले आहे .

ट्रम्प प्रशासनाची तेल बाजारावरील नजर

अमेरिकेचा हा प्रयत्न केवळ राजनैतिक दबावापुरता मर्यदित नसून त्यामागे आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रातील हितसंबंध असल्याचे मानले जात आहे . OPEC संघटना सदस्य देशांसाठी तेल उत्पादनाच्या मर्यादा निश्चित करते . त्यामुळे सदस्य देशांना त्यांच्या इच्छेनुसार उत्पादन वाढवता येत नाही . अमेरिकेला मात्र व्हेनेझुएला आणि इराकमध्ये तेल उत्पादन आणि गुंतवणूक वाढवायची आहे .

अमेरिकन तेल कंपन्यांना या देशांमध्ये अधिक संधी मिळाव्यात , अशीही प्रशासनाची भूमिका असल्याचे बातमीतून समोर आले आहे . OPEC च्या उत्पादन मर्यादांमुळे अमेरिकेच्या या योजनांना अडथळा निर्माण होऊ शकतो . अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती .

व्हेनेझुएलावर आर्थिक दबाव

व्हेनेझुएलाचे तत्कालीन अध्यक्ष निकोलस मादुरो यांना जानेवारीत सत्तेवरून हटवल्यानंतर अमेरिकेच्या तेथील सरकारी निधीवरील प्रभाव वाढला . याच काळात व्हॅनेझुएलाने OPEC मधून बाहेर पडण्याबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते आहे . इतकेच न्हवे तर व्हॅनेझुएलाला OPEC चे वार्षिक सदस्यत्व शुल्क भरण्यापासूनही रोखण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे .

हे शुल्क सुमारे २८ लाख युरो आहे . अमेरिकेच्या दबावाची माहिती समोर आल्यानंतर सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी हस्तक्षेप केला . त्यांनी ट्रम्प प्रशासनाला व्हेनेझुएलाच्या OPEC \मधून बाहेर पडण्याचा मुद्दा पुढे न रेटण्यास प्रवृत्त केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे .

इराकमध्येही चर्चेला वेग

इराकचे पंतप्रधान अली फालेह अल- झैदी यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर OPEC मधून बाहेर पडण्याची शक्यता सरकारच्या बैठकीत मांडल्याचे समजते आहे . पण इराकच्या तेल मंत्रालयाने या प्रस्तावाला विरोध केला . संघटनेमधून बाहेर पडण्याऐवजी तेल उत्पादनाचा अधिक कोटा मिळवण्याच्या प्रयत्न करावा अशी भूमिका मंत्रालयाने मांडली .

दरम्यान २०१९ पासून अंगोला , इक्वाडोर , कतार आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांनी OPEC मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे संघटनेच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . व्हेनेझुएला आणि इराकसारख्या संस्थापक सदस्यांनीही बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास जागतिक तेल बाजारपेठेतील OPEC चा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे .

शेतकऱ्यांच्या फळबागांची कराडच्या कृषी प्रदर्शनात चमक; कोणत्या फळाला मिळाला पहिला क्रमांक?

वाढदिवसाचा खर्च टाळून बळीराजाला मदत; राघवेंद्र मानकर यांच्याकडून ५ हजार किलो धान्य अन् २ लाखांचा निधी सुपूर्द

Mini Cooper SE इलेक्ट्रिक भारतात लाँच; किंमत 53.90 लाख रुपये, मिळणार 402 किमी रेंज

पुण्यानंतर नाशिकच्या महापालिकेचा फ्लेक्स लावणाऱ्यांना दणका! होर्डिंग्जवरील दादा, भाऊ, साहेब रस्त्यावर

Cheapest Gold Rate Across Indian : भारतात सर्वात स्वस्त सोनं कुठे मिळतं? या राज्यांची चर्चा; 22K, 24K वर आहेत आकर्षक ऑफर्स?