फोटो सौजन्य: @utsavtechie (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. यात इलेक्ट्रिक दुचाकींना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहक देखील इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा EVs खरेदीकडे जास्त वळताना दिसत आहे. हीच वाढती मागणी पाहता, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दाखल होत आहे. यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे Ather Energy.
इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Ather Energy ने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने लाँच झाल्यापासून एका वर्षात Ather Rizta च्या 1 लाख युनिट्स विकून मोठे यश मिळवले आहे. भारतात, Ather Rizta ची एक्स-शोरूम किंमत 1.05 लाख रुपये आहे. चला जाणून घेऊया, Ather Rizta मध्ये असे काय खास आहे की त्याच्या 1 वर्षात एक लाख स्कूटर विकले गेले?
Ather Rizta पहिल्यांदा एप्रिल 2024 मध्ये लाँच करण्यात आले होते आणि जून 2024 पासून भारतीय बाजारात त्याची विक्री सुरू झाली होती. लाँच झाल्यानंतर काही महिन्यांतच ही स्कूटर लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती.
भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हा स्कूटर डिझाइन करण्यात आले. लांब पल्ल्याच्या प्रवासातही पूर्ण आरामदायी आणि रुंद जागा, सामानासाठी 56 लिटरची अंडर सीट स्टोरेज आणि फूटरेस्टसाठी प्रशस्त फ्लोअरबोर्ड, चांगले ट्रॅक्शन आणि सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी स्किड कंट्रोल सिस्टम, स्मार्ट अलर्ट म्हणून टो आणि थीफ अलर्ट, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ब्रेकिंगसाठी ESS, लाइव्ह लोकेशन शेअरिंग आणि रिअल-टाइम नेव्हिगेशन आणि लोकेशन फीचर्ससाठी गुगल मॅप्स आहेत.
गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये Ather Rizta ची विक्री वाढली आहे.
भारतीय मार्केटमध्ये 2025 Suzuki V-Strom झाली लाँच, आता मिळणार ‘हे’ दमदार फीचर्स
एथर रिझटाच्या एक लाख विक्रीबद्दल, एथर एनर्जीचे सह-संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता म्हणाले की आम्ही गेल्या वर्षी कम्युनिटी डे वर आमची पहिली फॅमिली स्कूटर रिझट लाँच केली. आमचा विचार खूप सोपा होता – भारतीय कुटुंबांसाठी खरोखर काम करणारी स्कूटर बनवणे. मोठी सीट, मोठी बूट स्पेस आणि खूप आरामदायी राइड. आता एक वर्षही झाले नाही आणि रिझटाच्या 1 लाख युनिट्स विकल्या गेल्या आहेत. ही आमच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक बनली आहे. आम्हाला वाटते की आम्ही योग्य गरज ओळखली आहे – आता ती योग्य मार्गाने पुढे नेण्याची बाब आहे. रिझटाची निवड केल्याबद्दल सर्व ग्राहकांचे मनापासून आभार!