फोटो सौजन्य: YouTube
जगभरात अनेक कार निर्मात्या कंपनीज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अत्याधुनिक फीचर्ससह कार लाँच करत असतात. आता 2025 BYD Seal ही इलेक्ट्रिक सेडान नुकतीच लाँच झाली आहे. ही कार आता पूर्वीपेक्षा चांगल्या सेफ्टी फीचर्ससह आणली गेली आहे. इतकेच नाही तर त्याचा लूकही पूर्वीपेक्षा अधिक आकर्षित आणि स्टायलिश करण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक कारचे इंटिरिअरही अतिशय आलिशान पद्धतीने बनविण्यात आले आहे. चला जाणून घेऊया ही कार कोणत्या नवीन फीचर्ससह आली आहे आणि याची किंमत काय?
नवीन 2025 BYD सील इलेक्ट्रिक सेडानमध्ये LIDAR सेन्सर मॉड्यूल बसवले आहे. हे अडस म्हणजेच Advanced Driver Assistance Systems चे कार्य वाढविण्यासाठी वापरले जाते. याशिवाय, या कारमधील ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग फॅसिलिटी आणखी सुधारली गेली आहे. हे आता L2+ स्तर DiPilot 300 सिस्टिमसह आणले गेले आहे. ऑटोपायलटवर हाय-स्पीड, सिटी नेव्हिगेशन आणि ऑटोमेटेड व्हॅलेट पार्किंग सारख्या हाय फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
ही कार ई-प्लॅटफॉर्म 3.0 Evo वर आधारित आहे. या कारमध्ये 12-इन-1 इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टीम वापरण्यात आले आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार फास्ट चार्जिंग सिस्टिम, हाय एफिशिएंसी थर्मल मॅनेजमेंट मॉड्यूल, अत्याधुनिक CTB वेहिकल सेफ्टी आर्किटेक्चरसह येते.
ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे, ज्यात एक 61.44 kWh आणि दुसरे 80.64 kWh युनिट आहे. पहिल्या 61.44 kWh बॅटरी पॅकची रेंज 510 किमी आहे आणि 80.64 kWh ची रेंज 650 किमी आहे. ही इलेक्ट्रिक सेडान फक्त 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. त्याच वेळी, या कारचा टॉप स्पीड 240 किमी/तास आहे. या इलेक्ट्रिक कारची चांगली गोष्ट म्हणजे ही 10% ते 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 25 मिनिटे घेते.
नवीन 2025 BYD सील 650 लाँग रेंज एडिशनची किंमत 189,800 युआन (रु. 21.6 लाख) आहे, 650 इंटेलिजेंट ड्रायव्हिंग एडिशनची किंमत 216,800 युआन (रु. 24.7 लाख) आहे. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 239,800 युआन (27.31 लाख रुपये) आहे.
BYD Seal EV भारतात CBU म्हणून ऑफर केली जात आहे, ज्याची किंमत 41 लाख ते 53 लाख रुपये आहे. नवीन BYD Seal EV 2025 मॉडेल येत्या काही महिन्यांत भारतात लाँच होईल अशी अपेक्षा आहे.