फोटो सौजन्य: @mondialdelauto (X.com)
मार्केटमध्ये अनेक अशा उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्यांच्या कार्स भारतात तर लोकप्रिय आहेतच, पण ग्लोबल मार्केटमध्ये देखील त्यांची पकड चांगली आहे. अशीच एक कंपनी म्हणजे टोयोटा. टोयोटाने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. आता कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये अशी एक धमाकेदार कार सादर केली आहे, जी पेट्रोल संपल्यावर सुद्धा धावू शकणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
टोयोटाने त्यांच्या जागतिक मार्केटमध्ये नवीन सहाव्या जनरेशनची RAV4 SUV सादर केली आहे. ही कार केवळ स्टायलिश लूकमध्येच नाही तर त्यात तंत्रज्ञान आणि पॉवरचा उत्तम मिलाफ देखील आहे. या कारचा लूक मिनी फॉर्च्युनरसारखा स्पोर्टी आहे.
या एसयूव्हीमध्ये शार्प फ्रंट ग्रिल आणि मजबूत बॉडी लाईन्स आहेत, ज्यामुळे ती खूपच आकर्षक दिसते. या कारच्या इंटिरिअरमध्ये 12.9 -इंचाची मोठी टचस्क्रीन आहे, जी टोयोटाच्या लेटेस्ट एरेन सॉफ्टवेअरवर चालते. हे सॉफ्टवेअर नेव्हिगेशन, म्युझिक आणि कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी चांगले आहे. याशिवाय, 10.5 इंचाचा मल्टीमीडिया डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग आणि अनेक स्मार्ट फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.
‘या’ 5 दिमाखदार फीचर्समुळेच Tata Altroz facelift चा पगडा इतर गाड्यांवर भारी
नवीन RAV4 SUV दोन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये येते (स्ट्राँग हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड (PHEV). दोन्ही कार 2.5 -लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहेत. मजबूत हायब्रिड व्हेरियंट 236 एचपी आणि PHEV प्रकार 320 एचपी पॉवर जनरेट करतो. विशेष म्हणजे त्याचे PHEV मॉडेल एकदा चार्ज केल्यानंतर पेट्रोलशिवाय इलेक्ट्रिक मोडमध्ये 80 किमी धावू शकते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) देखील आहे. टोयोटा RAV4 सुमारे 35 किमी मायलेज देऊ शकते. ही कार फक्त 5.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठते, ज्यामुळे ही कार हाय परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये येते.
टोयोटाने RAV4 SUV मध्ये सुरक्षिततेबाबत पूर्ण तयारी केली आहे. हे टोयोटाच्या अॅडव्हान्स सेफ्टी सिस्टम “सेफ्टी सेन्स एडीएएस” ने सुसज्ज आहे, ज्यामध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर अलर्ट, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सारख्या प्रगत फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय, कारमध्ये 6 एअरबॅग्ज, पार्किंग कॅमेरा आणि सीट बेल्ट यांसारखी मूलभूत पण अतिशय महत्त्वाची सेफ्टी फीचर्स देखील स्टॅंडर्ड म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत. ज्यांना स्पोर्टी लूक आवडतो त्यांच्यासाठी ही SUV GR स्पोर्ट व्हर्जनमध्ये देखील उपलब्ध असेल.
लय वाईट ! ‘या’ कंपनीच्या विक्रीला उतरती कळा, अनुभवली 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण
अमेरिकन बाजारात टोयोटा RAV4 SUV ची सुरुवातीची किंमत सुमारे $30,645 म्हणजे अंदाजे 25.5 लाख रुपये आहे, तर त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत $38,950 म्हणजे अंदाजे 32.5 लाख रुपये पर्यंत जाते. कंपनीने अद्याप भारतात लाँच करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, लवकरच ती भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.