फोटो सौजन्य: X.com
भारतीय कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील स्पर्धा आता पूर्वीपेक्षा अधिक तीव्र होत चालली आहे. Citroen Basalt Coupe SUV ही थेट Kia Sonet ला टक्कर देत आहे. आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन आणि आधुनिक फीचर्समुळे दोन्ही SUVs ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. मात्र, यापैकी एक SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी कोणती कार अधिक Value For Money ठरते, हे समजून घेणे महत्त्वाचे.
Citroen Basalt मध्ये आराम आणि तंत्रज्ञानाचे उत्तम कॉम्बिनेशन पाहायला मिळते. यात मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच आरामदायक सीट्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय, मोठे बूट स्पेस कुटुंबीयांसोबतच्या प्रवासासाठी आणि लांबच्या जर्नीसाठी उपयुक्त ठरते. ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि रियर AC व्हेंट्समुळे ही SUV अधिक आरामदायक बनते.
2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार
दुसरीकडे, Kia Sonet फीचर्सच्या बाबतीत आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक मजबूत SUVs पैकी एक मानली जाते. यात प्रीमियम साउंड सिस्टीम, वेंटिलेटेड सीट्स, सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि अनेक स्मार्ट टेक्नोलॉजी फीचर्स मिळतात. दैनंदिन वापरात हे फीचर्स Sonet ला अधिक प्रीमियम अनुभव देतात. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत Kia Sonet थोडीशी आघाडीवर दिसते.
Citroen Basalt मध्ये पेट्रोल इंजिनचे 2 पर्याय उपलब्ध आहेत. इंजिन स्मूद ड्रायव्हिंग अनुभव देते आणि मायलेजही चांगले आहे. यातील सॉफ्ट सस्पेन्शनमुळे खराब रस्त्यांवरही प्रवास आरामदायक राहतो. Kia Sonet मात्र इंजिन पर्यायांच्या बाबतीत अधिक वैविध्य देते. यात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन्ससह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. जास्त पॉवर, चांगली परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या ड्रायव्हिंग स्टाइल्सची अपेक्षा असणाऱ्यांसाठी Sonet अधिक योग्य ठरते.
Citroen Basalt मध्ये 6 एअरबॅग्स, स्टॅबिलिटी कंट्रोलसह आवश्यक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत, जे गाडीला सुरक्षित बनवतात. तर Kia Sonet सेफ्टीच्या बाबतीत एक पाऊल पुढे आहे. यात ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर यांसारखी अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स मिळतात, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित होते.
जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल
Citroen Basalt आणि Kia Sonet या दोन्ही SUVs ची किंमत जवळपास सारखीच आहे. वेगळा डिझाइन आणि आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव हवा असेल, तर Basalt एक चांगला पर्याय ठरतो. मात्र, जास्त इंजिन पर्याय, भरपूर फीचर्स आणि प्रगत सेफ्टी टेक्नोलॉजीमुळे Kia Sonet ही SUV एकूणच अधिक व्हॅल्यू फॉर मनी ठरते.






