फोटो सौजन्य: Social Media
भारतामध्ये बजेट फ्रेंडली कार्सच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली तरी लक्झरी कार्सची क्रेझ काही कमी झालेली नाही. आजही रस्त्यांवर लक्झरी कार दिसल्या की अनेकांच्या नजरा त्यावर थांबतात, आणि या कार्स आकर्षकतेचा भाग होतात. भारतात अनेक उद्योजक, सेलिब्रिटी आणि उच्च वर्गातील व्यक्ती आपल्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी कार्सचा समावेश करत असतात. या कार्स त्यांच्या स्टाइल, लक्झुरी आणि आलिशान डिझाईन्समुळे लोकांमध्ये आकर्षण निर्माण करतात.
भारतात अनेक श्रीमंत कुटुंबीयांकडे विविध लक्झरी कार पाहायला मिळतात. भारतातील श्रीमंत कुटुंबीयांबद्दल बोलले जात आहे आणि यात अंबानी कुटुंबियांचा समावेश नसेल असे होणार नाही. अंबानी कुटुंबाकडे भारतातील सर्वात महागड्या लक्झरी आणि सुपरकार्सचे कलेक्शन आहे. अलीकडेच, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) चे अध्यक्ष आकाश अंबानी Ferrari Purosangue चालवताना दिसले. विशेष म्हणजे भारतात ही कार काही मोजक्याच लोकांकडे आहे. यात अंबानी कुटुंबाकडे दोन Purosangue एसयूव्ही आहेत.चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
खास John Abraham साठी महिंद्राने बनवली स्पेशल Thar Roxx, जाणून घ्या किंमत
आकाश अंबानी लाल रंगाची फेरारी Purosangue चालवताना दिसले. आकाश अंबानीची ही फेरारी V12 इंजिन असलेली हाय परफॉर्मन्स SUV आहे, जी दिसायला खूप आकर्षक आहे. यासोबतच ही कार खूप पॉवरफुल देखील आहे.
Ferrari Purosangue एसयूव्ही ही फेरारी ब्रँडची पहिली एसयूव्ही आहे, जी फेब्रुवारी 2024 मध्ये भारतात लाँच झाली होती. या एसयूव्हीची किंमत तब्बल 10 कोटी 50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमपासून सुरू होते. फेरारीच्या डिझाइन हायलाइट्सबद्दल सांगायचे झाले तर, फेरारी Purosangue एसयूव्हीमध्ये सिग्नेचर स्टाइलिंग उपलब्ध आहे.
या फेरारीमध्ये लांब बोनेट आणि उतार असलेले छप्पर आहे. या फेरारीची खास गोष्ट म्हणजे त्याची एरोब्रिज डिझाइन, जी F12 बर्लिनेटा सारखीच आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक रियर-हिंग्ड डोअर दिसतात. या कारचे डिझाइन याला आणखी लक्झरी बनवते.
फेरारीच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, फेरारी Purosangue एसयूव्हीमध्ये 6.5-लिटर V12 पेट्रोल इंजिन आहे, जे 725 एचपी पॉवर आणि 716 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही एसयूव्ही फक्त 3.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग गाठते. याशिवाय, कारचा टॉप स्पीड 310 किमी/तास पेक्षा जास्त आहे.