फोटो सौजन्य: powerdrift (Instagram)
भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे महिंद्रा. महिंद्राने देशात बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स कार ऑफर केल्या आहेत. यामुळेच तर लक्झरी कारच्या क्रेझमध्ये महिंद्राच्या कारसुद्धा आहे. यातही महिंद्रा थारची क्रेझ तर मार्केटमध्ये वेगळ्याच लेव्हलवर आहे. म्हणूनच तर सामान्यांबरोबर अनेक सेलिब्रेटी मंडळी सुद्धा महिंद्रा थार आपल्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट करत असतात. नुकतेच बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहामने Mahindra Thar Roxx खरेदी केली आहे.
जॉन अब्राहमने त्याच्या कार कलेक्शनमध्ये एक खास महिंद्रा थार रॉक्स कार जोडली गेली आहे. जॉनचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो शोरूममध्ये या कारसोबत दिसत आहे. यासोबतच या थार रॉक्सच्या सीट आणि बॉडीवर जॉनचा पर्सनल लोगो लागला आहे, जे या थारला अजूनच स्पेशल बनवते.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता जॉन अब्राहम सध्या त्याच्या ‘The Diplomat’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका भारतीय राजदूताच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, जॉन अब्राहमला बाईक आणि कारचीही खूप आवड आहे. नुकतेच जॉनने सोशल मीडियावर कस्टम-मेड महिंद्रा थार रॉक्सचे अनावरण केले आहे, जे खूपच वेगळे दिसते. या कारमध्ये जॉन अब्राहमच्या नावाचा लोगो देखील दिसतो. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
जॉन अब्राहमने ब्लॅक लूकमध्ये थारला खरेदी केले आहे. यासोबतच, कारच्या सीट आणि बॉडीवर अभिनेत्याचा पर्सनल लोगो देखील बनवण्यात आला आहे. या कारमध्ये काळ्या रंगाचे अलॉय व्हील्स बसवले आहेत, ज्यामुळे याचा लूक आणखी पॉवरफुल बनतो. या कारचे इंटिरिअर देखील पूर्णपणे ब्लॅक आहे. महिंद्राने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या कारचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जॉन अब्राहम आणि महिंद्राचे डिझाइन प्रमुख प्रताप बोस या कारबद्दल चर्चा करत आहेत.
ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही ! ‘या’ Sport Bike वर मिळतेय 43,000 रुपयांची सूट, आजच करून टाका बुक
एका वृत्तानुसार, थॉर रॉक्स कारची किंमत 12.99 लाख रुपयांपासून ते 23.09 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याच्या 4WD मॉडेलची किंमत 19.09 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार फोर्स गुरखा 5-डोअर आणि मारुती जिमनी सारख्या वाहनांशी स्पर्धा करते.
जॉन अब्राहमला कार आणि बाईकची प्रचंड आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये अनेक आलिशान कार आणि बाईक समाविष्ट आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनी गॅलार्डो, निसान जीटी-आर ब्लॅक एडिशन, पोर्श केयेन, जीप कंपास आणि मारुती जिप्सी सारख्या कारचा समावेश आहे.
जॉन अब्राहमला फक्त कारच नाही तर बाइक्स चीही आवड आहे, त्याच्याकडे यामाहा व्हीएमएक्स, डुकाटी डायव्हेल, एप्रिलिया आरएसव्ही4 आरएफ, बीएमडब्ल्यू एस1000 आरआर आणि कावासाकी निन्जा झेडएक्स-14आर सारख्या अनेक उत्तम बाईक्स आहेत.