फोटो सौजन्य: iStock
एखादे वाहन खरेदी केल्यानंतर सर्वात महत्वाचे काम असते ते म्हणजे त्या कार किंवा बाईकला Number प्लेट लावून घेणे. यासाठी आपल्याला जवळील RTO केंद्रात जावे लागते आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यात आता सरकारने संपूर्ण राज्यात HSRP नंबर प्लेट असणे अनिवार्य केले आहे. हा निर्णय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत घेण्यात आला आहे. तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक असे भन्नाट अॅप आले आहेत, ज्यामुळे आपल्याला काही मिनिटातच माहिती मिळते.
जर तुम्हाला एखाद्याच्या वाहनाची माहिती हवी असेल तर तुम्ही ती ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मिळवू शकता. mParivahan वेबसाइट आणि मोबाईल अॅपच्या मदतीने, वाहन क्रमांक टाकून काही मिनिटांत ऑनलाइन डिटेल्स मिळवता येतात.
भारतात Audi Q7 Signature Edition लाँच, प्रीमियम किमतीत मिळणार पर्मियम फीचर्स
mParivahan व्यतिरिक्त, अनेक थर्ड पार्टी अॅप्सद्वारे कार मालकाची माहिती मिळवता येते. चालों जाणून घेऊयात की ऑनलाइन पद्धतीने कारची माहिती कशी मिळवायची.
जर तुम्हाला कोणत्याही वाहनाची माहिती जाणून घ्यायची असेल, तर mParivahan अॅप किंवा वाहन पोर्टलमुळे ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. सर्वप्रथम, तुम्हाला mParivahan अॅप डाउनलोड करावे लागेल. हा अॅप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोअरवर आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे.
तुम्ही mParivahan च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. अॅप किंवा पोर्टल उघडल्यानंतर, सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे लागेल. OTP पडताळणीनंतर, 6-अंकी MPIN सेट करावा लागेल, जेणेकरून तुम्ही भविष्यात सहजपणे लॉगिन करू शकाल.
लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला ज्या वाहनाची माहिती मिळवायची आहे त्याचा व्हेईकल नंबर सबमिट करा- जसे की “DL01AB1234”. यानंतर “Search Vehicle” किंवा “Check RC Status” बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला त्या वाहनाशी संबंधित माहिती मिळेल, जसे की मालकाचे पहिले नाव, वाहन कधी नोंदणीकृत होते, फिटनेस आणि इंश्युरन्स कधीपर्यंत वैध आहे, वाहन कोणत्या क्लासची आणि कंपनीची आहे. परंतु, गोपनीयतेमुळे, संपूर्ण पत्ता आणि मोबाइल नंबर दर्शविला जात नाही.
Tata Motors कडून भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी-ट्रक लाँच, किंमत 3.99 लाख पासून सुरू
ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आहे कारण mParivahan ही भारत सरकारची अधिकृत सेवा आहे, जी पोलिस, वाहतूक विभाग आणि सामान्य नागरिक वाहने ओळखण्यासाठी, चोरीच्या घटना तपासण्यासाठी आणि रस्त्यावरील कोणत्याही संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यासाठी वापरू शकतात.
लक्षात ठेवा की काही थर्ड पार्टी अॅप्स देखील अशी सेवा देण्याचा दावा करतात, परंतु त्यांची सुरक्षितता प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. म्हणून नेहमी फक्त mParivahan अॅप किंवा वाहन पोर्टल वापरा.