फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)
भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाईक्सची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. यातही काही अशा बाईक आहेत ज्यांच्या विक्रीवर नवीन बाईक्स लाँच होत असल्या तरी काही फरक पडत नाही आहे. देशात अनेक बाईक उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक महत्वाची कंपनी म्हणजे बजाज.
बजाजने देशात बाईक्स सोबतच स्कूटर देखील लाँच केले आहे. मागच्याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच केली होती. यानंतर मार्केटमध्ये या बाईकबद्दल एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. पण आज आपण बजाजच्या अशा बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, जिची मार्केटमध्ये Bajaj Freedom 125 पेक्षा जास्त क्रेझ आहे.
बजाजच्या टू व्हिलर्स भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. जर आपण गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2025 मधील कंपनीच्या विक्रीबद्दल बोललो तर बजाज पल्सरने अव्वल स्थान पटकावले होते. गेल्या महिन्यात बजाज पल्सरला एकूण 87,202 नवीन ग्राहक मिळाले. परंतु, या काळात, बजाज पल्सरच्या विक्रीत वार्षिक आधारावर 21.90 टक्क्यांची घट देखील झाली. असे असूनही, कंपनीच्या एकूण विक्रीत एकट्या पल्सरचा वाटा 64.31 टक्के होता. मागील महिन्यात कंपनीच्या इतर मॉडेल्सच्या विक्रीबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
या विक्री यादीत बजाज चेतक दुसऱ्या स्थानावर होती. बजाज चेतकने फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 21,420 स्कूटर विकल्या, ज्यात वार्षिक वाढ 57.27 टक्के आहे. तर या विक्री यादीत बजाज प्लॅटिना तिसऱ्या स्थानावर आहे. बजाज प्लॅटिनाने एकूण 20,923 बाईक्स विकल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 27.14 टक्क्यांची घट झाली. त्याच वेळी, या विक्री यादीत बजाज सिटी चौथ्या स्थानावर होती. बजाज सिटीने एकूण 3,369 बाईक्स विकल्या, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 29.33 टक्क्यांची घट झाली.
नवीन मॉडेल येताच ‘या’ SUV ने गुंडाळला आपला संसार ! कंपनीने वेबसाइटवरून हटवली कार
दुसरीकडे, बजाज अॅव्हेंजर या विक्री यादीत पाचव्या स्थानावर आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये बजाज अॅव्हेंजरने एकूण 1,316 बाईक विकल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 15.43 टक्क्यांची घट झाली. याशिवाय, या विक्री यादीत बजाज फ्रीडम सहाव्या स्थानावर होते. बजाज फ्रीडमचे 1,027 युनिट्स या कालावधीत विकले गेले आहे. त्याच वेळी, बजाज डोमिनार या विक्री यादीत सातव्या स्थानावर होते. बजाज डोमिनारने एकूण 731 बाईक्स विकल्या, ज्याची वार्षिक वाढ 4.73 टक्के आहे.