फोटो सौजन्य: iStock
देशात अनेक उत्तम कार लाँच होत आहे. यातही अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार चांगल्या फीचर्स असणाऱ्या कार ऑफर करत आहे. यातीलच एक ऑटो कंपनी म्हणजे Volkswagen. आता लवकरच ही कंपनी मार्केटमध्ये नवीन कार लाँच करणार आहे. पण यामुळे कंपनी आपलीच एक कार मार्केटमध्ये बंद करणार असल्याचे बोलले जात आहे.
बाजारात नवीन जनरेशनची Tiguan R–Line लाँच होण्यापूर्वी फोक्सवॅगन इंडियाने अधिकृतपणे त्यांच्या वेबसाइटवरून Tiguan काढून टाकले आहे. हे मॉडेल फक्त एलिगन्स व्हर्जनमध्ये उपलब्ध होते. ज्याची एक्स-शोरूम किंमत 38.17 लाख रुपये होती. खरंतर, कंपनीच्या वेबसाइटवर आता फक्त नवीन टिगुआन आर-लाइनच दिसत आहे. याचा अर्थ असा की ज्या ग्राहकांना टिगुआनचे जुने मॉडेल खरेदी करायचे आहे ते आता ही खरेदी करू शकणार नाहीत. टिगुआन कार वेबसाइटवरून हटवली याचे कारण कंपनीचा जुना स्टॉक देखील संपला असावा, असे देखील असू शकते.
टिगुआन कारमध्ये 2.0-लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन होते, जे सात-स्पीड डीएसजी गिअरबॉक्सशी जोडलेले होते. या कारमधील मोटर 187bhp आणि 320Nm पीक टॉर्क जनरेट करते. आता, येणाऱ्या टिगुआन आर-लाइनमध्येही समान क्षमतेचे इंजिन मिळेल जे 201bhp पॉवर आणि 320Nm टॉर्क निर्माण करेल. तेच या कारमध्ये 4-स्पीड AWD स्वरूपात सात-स्पीड DCT गिअरबॉक्ससह जोडले जाईल. या कारची किंमत सुमारे 50 ते 55 लाख रुपये असू शकते असे मानले जाते.
नवीन टिगुआन आर-लाइन एसयूव्ही तिच्या आकर्षक आणि बोल्ड डिझाइनमुळे देखील खास ठरते. या कारच्या डायमेन्शन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्याची लांबी 4539 मिमी, रुंदी 1859 मिमी, उंची 1656 मिमी आणि व्हीलबेस 2680 मिमी आहे. नवीन फोक्सवॅगन टिगुआन आर-लाइनमध्ये अनेक खास फीचर्स उपलब्ध आहेत. टिगुआन आर-लाइन ही स्पोर्टी आर-प्रेरित डिझाइन, प्रगत सेफ्टी फीचर्स, प्रीमियम इंटिरिअर, नवीनतम तंत्रज्ञान, पॉवरफुल इंजिन आणि सुधारित परफॉर्मन्ससाठी ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह एक उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.
मार्केट गाजवण्यासाठी Mahindra आणणार 5 जबरदस्त Electric SUV, मिळणार 500 km पेक्षा जास्त रेंज
कंपनीने टिगुआन आर-लाइनसाठी बुकिंग देखील सुरू केली आहे. जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर तुम्ही कोणत्याही फोक्सवॅगन डीलरशिपला भेट देऊन किंवा अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ती प्री-बुक करू शकता.